About Us

शासन योजना ही वेबसाईट निर्माण करण्यामागचा आमचा हेतू असा की महाराष्ट्र राज्यातील तसेच इतर राज्यात राहणाऱ्या मराठी भाषिक जनतेसाठी केंद्र शासनाच्या अथवा महाराष्ट्र शासनाच्या मार्फत ज्या लोकोपयोगी योजना राबविल्या जातात त्या योजनांबद्दल मुद्देसूद आणि सविस्तर माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत उपलब्ध करून देणे.

वर्तमान काळात प्रत्येक घरामध्ये एक तरी स्मार्टफोन वापरला जातो आणि मोबाईल डाटा ही सर्वांच्या आवाक्यात आहे. त्यामुळे जगभरातील कुठलीही माहिती आपण गुगल वर जाऊन मिळवू शकतो. याच अनुषंगाने स्मार्ट फोन वरती अगदी घरबसल्या शासनाच्या विविध योजनांबद्दल मराठी भाषेत माहिती प्राप्त करणेकरीता शासन योजना ही वेबसाईट मराठी भाषा जाणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपयोगी ठरणार आहे.

शासन योजना या वेबसाईटवर प्रकाशित झालेले लेख हे शासनाचे जी. आर. , वृत्तपत्रातील लेख,  टेलिव्हिजन आणि इतर शासकीय वेबसाईट वरील माहिती संकलित करून तयार केलेले आहेत. नागरिकांना समजेल अशा सोप्या आणि सरळ भाषेत अगदी मोबाईल फोन वरती ही बघता येईल आणि योजनांचा लाभ घेता येईल हेच आमचे सदैव प्रयत्न असतील. धन्यवाद.