भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (महाराष्ट्र) 2023 | Bhausaheb Fundkar Orchard Plantation Scheme (Maharashtra) 2023 To Help Farmers Increase Income

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बहुवार्षिक फळबाग लागवडीकरिता अर्थसहाय्य | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदानित बाबींचे PDF | Bhausaheb Fundkar Scheme Subsidy PDF | Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana Online Apply

महाराष्ट्र राज्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नती करिता अनेक योजना राबविल्या जातात. अशीच एक योजना महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येत आहे जिचे नाव  भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना “ असे आहे.

केंद्र शासनाने सन 2005 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केलेली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून राज्य शासनाने सदर योजनेतून फळबाग लागवडीसाठी अर्थसहाय्य देण्याचे ठरविले होते आणि राज्याच्या 1990 पासून सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेशि संबंधित फळबाग लागवड योजनेअंतर्गत अर्थसाहाय्य देणे टप्प्या-टप्प्याने बंद केले होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फक्त “जॉब कार्ड असणाऱ्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातींचे शेतकरी” फळबाग लागवडीकरिता दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. परंतु महाराष्ट्र राज्यात 80 टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड नसल्याने ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकरिता अनुदान मिळण्यास अपात्र ठरत आहेत.

अशाप्रकारे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता अपात्र आहेत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनातर्फे नवीन राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना सुरू करण्याचा निर्णय दिनांक 20 जून 2018 रोजी घेण्यात आला. या राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजनेला माजी कृषिमंत्री कै. भाऊसाहेब (पांडुरंग) फुंडकर यांच्या नावाने राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आला.

प्रमुख वैशिष्ट्ये

योजनेचे उद्देश्य

 • शेतकऱ्यांना पीक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे.
 • ह्या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास देखील सहाय्यक ठरेल.
 • फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे शक्य होईल.
 • हवामान आणि ऋतू बदलामुळे होणाऱ्या परिणामांची दाहकता व तीव्रता सौम्य करण्यास देखील मदत होईल.

योजने अंतर्गत समाविष्ट कलमे / रोपे आणि क्रियान्वयन कालावधी

 • या योजनेअंतर्गत बहुवार्षिक फळबागांच्या लागवडीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल. 
 • राज्यातील विविध ठिकाणांच्या हवामान क्षेत्रानुकूल असणाऱ्या फळांच्या व त्यांच्या प्रजातींच्या कलमांच्या / नारळ रोपांच्या लागवडीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल.
 • योजना अंतर्गत फळबाग लागवडीचा कालावधी हा प्रतिवर्षी मे ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत राहील.
 • प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वर्तमानपत्रात शासनाद्वारे जाहिरात प्रसिद्ध करून योजनेंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येतील.
 • या योजनेअंतर्गत वृक्ष आधारित खालील बहुवार्षिक फळबागांच्या लागवडीसाठी तीन वर्षांच्या कालावधीत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी अनुक्रमे 50 %, 30 % व 20 % अर्थ सहाय्य देण्यात येईल.
पात्र असलेली फळांची कलमेआंबा
डाळिंब
काजू
पेरू
सिताफळ
आवळा
चिंच (विकसित जाती)
जांभूळ
कोकम
फणस
कागदी लिंबू
चिकू
संत्रा
मोसंबी
अंजीर
पात्र असलेली फळांची रोपेनारळ रोपे बाणावली
नारळ रोपे टी / डी
 • योजनेअंतर्गत अनुसूचित जाती च्या लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत ‘विशेष घटक योजनेतून’ आवश्यक तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या ‘आदिवासी उपयोजना अंतर्गत ‘ आवश्यक तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल.

योजनेअंतर्गत क्षेत्र (शेत जमीन) मर्यादा

 • फळबाग लागवडीकरिता कोकण क्षेत्रात जास्तीत जास्त 10 हेक्टर व कमीत कमी 10 गुंठे पर्यंत लाभ देण्यात येईल.
 • उर्वरित महाराष्ट्रात जास्तीत जास्त 6 हेक्टर व कमीत कमी 20 गुंठे पर्यंत लाभ देण्यात येईल.
 • या क्षेत्र मर्यादेत शेतकरी त्याच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळ पिकांच्या लागवडीकरिता पात्र राहील.
 • 7/12 नोंदणी नुसार जर शेतकरी संयुक्त खातेदार असेल तर त्याच्या नावे असलेल्या( हिस्स्यात असलेल्या ) क्षेत्राकरिता त्याला लाभ देण्यात येईल.
 • जे शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत लाभ घेण्यास पात्र असतील त्यांची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत निवड करून त्यांना प्रथमतः सदर योजनेअंतर्गत असणाऱ्या कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत (सद्यस्थितीत दर मर्यादा 2 हेक्टर ) फळबाग लागवड करिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल व त्यानंतरच त्या शेतकऱ्यांचा या योजनेसाठी विहित केलेल्या कमाल मर्यादेपर्यंत विचार करण्यात येईल.
 • ज्या शेतकऱ्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2 हेक्टर क्षेत्र पर्यंत लाभ घेतलेला असेल त्या परिस्थितीत सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून कोकण विभागातील शेतकऱ्यांना अधिकच्या 8 हेक्टर व उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अधिकच्या 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येईल.

योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्रता

 • शेतकऱ्याचा स्वतःच्या नावे 7/12 उतारा असणे आवश्यक आहे.
 • जर 7/12 उताऱ्यावर संयुक्तपणे खातेदार असतील तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमती पत्र जोडावे लागेल.
 • योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल. ( संस्थात्मक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही )
 • 7/12 उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर फळबाग लागवडी करिता कुळाचे संमती पत्रक जोडावे लागेल.
 • परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम, 2006 अनुसार वनपट्टे धारक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील.
 • ज्या शेतकऱ्यांची उपजीविका पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येईल.
 • तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी , महिला शेतकरी , दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येईल.

योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या बाबी / कामे

शेतकऱ्यांना स्व-खर्चाने करावयाची कामे (लाभार्थी शेतकरयांना 100 % खर्च करावा लागेल)
1) जमीन तयार करणे
2) माती व शेणखत / सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे
3) रासायनिक खत वापरून खड्डे भरणे
4) आंतर मशागत करणे
5) काटेरी झाडांचे कुंपण (ऐच्छिक)
राज्य शासन अनुदानित बाबी / कामे ( राज्य शासनातर्फे 100 % अनुदान )
1) खड्डे खोदणे
2) कलमे लागवड करणे (नारळाच्या बाबतीत रोपे)
3) पीक संरक्षण
4) नांग्या भरणे
5) ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे

शेतकऱ्यांना फळ पिकानुसार व त्यांच्या लागवडीच्या अंतरानुसार शासनातर्फे ज्या कामांना अनुदान देण्यात येणार आहे त्याचा तपशील पीडीएफ (PDF) स्वरूपात या लेखाच्या शेवटी दिलेला आहे तो तुम्ही बघू शकता अथवा डाउनलोड ही करू शकता.

योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य , त्याचा कालावधी आणि अटी

 • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संचाच्या खरेदी व उभारणी करिता 100 % अनुदान देण्यात येईल.
 • योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकार पुरस्कृत ठिबक सिंचनाच्या योजनेतून ( प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- प्रति थेंब अति पिक ) दिले जाणारे अनुदान प्रथम देण्यात येईल व नंतर वेगवेगळ्या प्रकारचे राज्य पुरस्कृत  ठिबक सिंचनाच्या योजनेतून उर्वरित अनुदान देण्यात येईल.
 • योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण तीन वर्षाच्या कालावधीत पहिल्या वर्षी 50 % , दुसऱ्या वर्षी 30 % आणि तिसऱ्या वर्षी 20 % प्रमाणे अनुदान सबसिडी देण्यात येईल
 • शेतकऱ्यांनी लावलेली फळझाडे पहिल्या वर्षी कमीत कमी 80 % व दुसऱ्या वर्षी कमीत कमी 90% जगविणे गरजेचे राहील.
 • याप्रमाणे फळझाडे जगविण्याचे प्रमाण न राखल्यास शेतकरी दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानास पात्र ठरणार नाही.
 • शेतकऱ्यांना देय असलेले अनुदान हे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
 • शेतकऱ्याने कलम / नारळ रोपे शासकीय रोपवाटिकेतून किंवा राज्यातील कृषी विद्यापीठांच्या रोपवाटिकेतून घेतले असल्यास त्या बाबींचे अनुदान थेट संबंधित संस्थांना अदा करण्यात येईल.
 • फळबाग लागवडीकरिता प्रत्यक्ष खर्च जर मापदंडानुसार निश्चित केलेल्या खर्चापेक्षा कमी आला असेल तर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष खर्चा एवढेच अनुदान मिळेल.

योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड खालील पद्धतीने होईल

 • राज्य शासनातर्फे वर्तमानपत्रांमध्ये प्रतिवर्षी एप्रिल महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल तसेच अन्य माध्यमांद्वारेही प्रसिद्धी करून इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात येतील.
 • शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावे लागतील.
 • इच्छुक शेतकऱ्यांना जाहिरात दिल्याच्या तारखेपासून 21 दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल.
 • योजनेअंतर्गत एखाद्या तालुक्याला दिलेल्या आर्थिक लक्ष्या पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या अर्जांची तालुका पातळीवर सोडत काढून लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
 • एखादा तालुक्याला दिलेल्या आर्थिक लक्ष्या पेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास त्या तालुक्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याद्वारे परत जाहिरात देण्यात येईल आणि अर्ज मागविण्यात येतील.

योजनेअंतर्गत शासनाद्वारे पूर्वसंमती आणि अटी

 • निवड झालेल्या लाभार्थ्यांना दोन दिवसात पूर्वसंमती देण्यात येईल.
 • लाभार्थ्यांना शासकीय किंवा कृषी विद्यापीठांच्या रोपवाटिकेतून कलमे / नारळ रोपांची खरेदी करण्याचे असल्यास त्यांना पूर्वतसंमती सोबत खरेदीसाठी परवाना देण्यात येईल.
 • पूर्वसंमती मिळाल्याच्या तारखेपासून 75 दिवसांच्या आत सर्व बाबींसोबत फळबागेची लागवड करणे गरजेचे राहील.
 • पूर्व संमती नंतर 75 दिवसात जर सर्व बाबींसह फळबागेची लागवड झाली नाही त्या लाभार्थ्यांची पूर्वसंमती रद्द करण्यात येईल आणि प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.

योजनेअंतर्गत तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी

 • पूर्वसंमती दिल्यानंतर कृषी सहाय्यक हे लाभार्थ्याच्या लागवड क्षेत्रास भेट देतील आणि तांत्रिक अंदाजपत्रक तयार करतील आणि पूर्वसंमती दिल्याच्या तारखेपासून दहा दिवसाच्या आत सक्षम प्राधिकार्‍याकडे शिफारशीसह तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करतील.
 • तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थ्याने फळबाग लागवडीची कारवाई 75 दिवसात पूर्ण करावी.
 • लागवडीचे अंदाजपत्रक तयार करून त्यावर क्षम प्राधिकार्‍याची तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्यानंतरच लाभार्थ्याने फळबागेची लागवड करण्यास सुरुवात करावी.

योजनेअंतर्गत फळबाग लागवड व अनुदानाचे वितरणाची पद्धत

 • फळबागेची लागवड केल्यानंतर शेतकऱ्याने फळबागेबाबतच्या नोंदी त्यांना दिलेल्या मापन पुस्तिकेत वेळोवेळी ठेवणे गरजेचे आहे.
 • फळबाग लागवडीची शेतकऱ्याच्या 7/12 वर नोंद घेणे अनिवार्य आहे. त्याशिवाय ते अनुदानास पात्र असणार नाहीत.
 • मापन पुस्तिकेतील पहिल्या वर्षीच्या नोंदी तपासून आणि त्याला प्रमाणित केल्यानंतरच शेतकऱ्यांना पहिल्या वर्षाचेअनुदान देण्यात येईल.
 • शेतकऱ्याने कलमे / नारळ रोपे शासकीय रोपवाटिकेतून किंवा कृषी विद्यापीठाचे रोपवाटिकेतून खरेदी केले असल्यास सदर खरेदीचे अनुदान थेट त्या संबंधित संस्थेला देण्यात येईल आणि अन्य कामांचे अनुदान शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
 • शेतकऱ्याने कलमे / नारळ रोपांची खरेदी शासनाद्वारे मानांकित खाजगी रोपवाटेकडून केल्यास अनुदानाची रक्कम व देयकाची रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल ती शेतकऱ्याला देण्यात येईल.
 • पहिल्या वर्षी जे बागायती शेतकरी कमीत कमी 90% आणि कोरडवाहू शेतकरी कमीत कमी 80 % झाडे जिवंत ठेवतील तेच दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या अनुदानासाठी पात्र असतील.

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.

 अधिकृत वेबसाईट – www.mahadbtmahait.gov.in

तुमच्या पुढे खालील पेज उघडेल

mahadbtmahait

त्यानंतर तुम्हाला वरील पेजवर उजव्या बाजूला असलेल्या “शेतकरी योजना” वर क्लिक करावे लागेल. आता तुमच्या पुढे खालील पेज उघडेल.

mahadbtmahait

जर तुम्ही नवीन अर्जदार असाल तर तुम्हाला आधी “ नवीन अर्जदार नोंदणी “ यावर क्लिक करावे लागेल.  “ नवीन अर्जदार नोंदणी “ यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे खालील पेज ओपन होईल. तुम्ही जर जुने अर्जदार असाल तर “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा.

mahadbtmahait
 • वरील पेज वर तुम्हाला अर्जदाराचे नाव भरावे लागेल. त्यानंतर वापरकर्त्याचे नाव (लॉगिन आयडी) आणि पासवर्ड दिलेल्या सूचना नुसार प्रविष्ट करावा लागेल.
 • त्यानंतर जर तुमचा ईमेल आयडी असेल तर तो प्रविष्ट करून “ईमेल आयडी ची सत्यता तपासणीकरिता ओटीपी मिळवा” वर क्लिक करावे लागेल आणि तुमच्या ईमेल आयडी वर आलेला ओटीपी प्रविष्ट करून “ओटीपी तपासा” वर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून “मोबाइल क्रमांकाची सत्यता तपासणीकरिता ओटीपी मिळवा” वर क्लिक करावे लागेल आणि तुमच्या मोबाईल वर आलेला ओटीपी प्रविष्ट करून “ओटीपी तपासा” वर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर प्रतिमेत दर्शविलेले शब्द (captcha) प्रविष्ट करून “नोंदणी करा” वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ओके वर क्लिक करून पुढे जावे लागेल.
 • आता खालील पेजवर तुम्ही लॉगिन चा प्रकार निवडून लॉगिन करू शकाल.
mahadbtmahait
 • वापरकर्ता आयडी मध्ये तुम्हाला जो तुम्ही वरील प्रमाणे लॉगिन आयडी आणि पासवर्ड सेट केलेला आहे तो प्रविष्ट करून लॉगिन करता येईल.
 • किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करून सुद्धा तुम्ही लॉगिन करू शकाल. आधार क्रमांक प्रविष्ट केल्यावर ओटीपी वर क्लिक केल्यानंतर “ओटीपी पाठवा” वर क्लिक करावे लागेल. हा ओटीपी तुमच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येईल तो प्रविष्ट करून “ओटीपी तपासा” वर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला तुमचे प्रोफाइल (वैयक्तिक माहिती) संपूर्णपणे भरावी लागेल. सर्व * चिन्हांकित माहिती भरणे अनिवार्य राहील जसे संपूर्ण नाव, जातीचा तपशील, आधार संलग्न बँक खात्याची माहिती, कायमचा पत्ता, पत्रव्यवहाराचा पत्ता, शेत जमिनीचा तपशील इत्यादी माहिती भरून आपण आपले प्रोफाईल स्थिती 100% पूर्ण करणे गरजेचे आहे.
 • लॉगिन झाल्यावर खालील पेज उघडेल.
mahadbtmahait

अर्ज करा वर क्लिक केल्यानंतर खालील पेज उघडेल

mahadbt

फलोत्पादन या घटका अंतर्गत तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना समोरील बाबी निवडा वर क्लिक करावे लागेल. पुढे खालील पेज उघडेल.

वरील पेज मध्ये आवश्यक सगळ्या बाबी भरून जतन करा वर क्लिक करून अर्ज सादर करा वर क्लिक करावे लागेल.

फळ पिकानुसार व त्यांच्या लागवडीच्या अंतरानुसार शासनातर्फे ज्या कामांना अनुदान देण्यात येणार आहे त्याचा तपशील पीडीएफ (PDF) स्वरूपात

नेहेमी विचारण्यात येणारे प्रश्न

इतर महत्वाच्या योजना :

महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना 2023

नवीन सुधारित महाराष्ट्र मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2023

महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना (MJPJAY) 2023

Share On:

Leave a Comment