बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) 2023 | Birsa Munda Krushi Kranti Yojana(BMKKY) Updated

Birsa Munda Krishi Kranti Yojana Maharashtra details | महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना माहिती | महाराष्ट्र बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अर्ज प्रक्रिया | Birsa Munda Krishi Kranti Yojana online application | Irrigation scheme for Maharashtra Adivasi community

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात अशीच एक योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे तिचं नाव “बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना” असे आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना संबंधित सर्व महत्त्वाची माहिती देणार आहोत जसे की या योजनेचे फायदे, उद्देश, पात्रता, वैशिष्ट्ये, महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इत्यादि.

Birsa Munda Krushi Kranti Yojana

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनुसूचित जमातीच्या ( Scheduled Tribes /ST) शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे अर्थसहाय्य देण्याची जी जुनी योजना “आदिवासी उपयोजना” 1992-93 पासून राबवण्यात येत होती ती आजच्या बदललेल्या परिस्थितीनुसार आणि शेतकऱ्यांच्या आवश्यकता विचारात घेता सुधारित करून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या  नावाने 30 डिसेंबर 2017 पासून शासनातर्फे सुरू करण्यात आली. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे आणि सिंचनासाठी आदिवासी शेतकऱ्यांना शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती चे शेतकरीच घेऊ शकतील.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत दिलेले लाभ आणि आर्थिक मदत

अनु. क्र कुठल्या कामाकरिता
अनुदान रक्कम 
1नवीन विहिरींचे बांधकाम2.50 लाख 
2जुन्या विहिरींची दुरुस्ती50 हजार रुपये
3विहिरीमध्ये बोरिंग20 हजार रुपये
4वीज जोडणी आकार10 हजार रुपये
5 प्लॅस्टिक अस्तरावरील शेत1 लाख
6सूक्ष्म सिंचन संच
अ. ठिबक सिंचन 
ब. तुषार सिंचन 
50 हजार रुपये
25 हजार रुपये
7
परसबाग 
500 रुपये
8पंप संच ( डिझेल / विद्युत )20 हजार रुपये
9
पीव्हीसी पाईप 
30 हजार रुपये

सदर योजनेत वरील 9 घटक असून लाभ हा पॅकेज स्वरूपात देण्याचे शासनाने ठरविले आहे. हे पॅकेज खालील प्रमाणे असतील.

  • नवीन विहीर पॅकेज : नवीन विहीर , वीज जोडणी आकार , सूक्ष्म सिंचन संच , पंपसंच , पीव्हीसी पाईप , परसबाग व आवश्यकतेनुसार इनवेल बोरिंग.
  • जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज : जुनी विहीर दुरुस्ती , वीज जोडणी आकार , सूक्ष्म सिंचन संच , पंपसंच ,पीव्हीसी पाईप , परसबाग व आवश्यकतेनुसार इनवेल बोरिंग.
  • शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेज : शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण , वीज जोडणी आकार , सूक्ष्म सिंचन संच, पंपसंच , पीव्हीसी पाईप , परसबाग.
  • ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी शासकीय योजनेतून विहीर घेतली असेल किंवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतकऱ्यांना वीज जोडणी आकार , सूक्ष्म सिंचन संच , पंपसंच , पीव्हीसी पाईप , परसबाग यासाठी अनुदान देय राहील.
  • सोलर पंपासाठी अनुदान : जर शेतकऱ्यास महावितरण कंपनीकडून सोलर पंप मंजूर झाला असेल तर पंपसंच व वीज जोडणी साठी अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत (रुपये तीस हजार) लाभार्थी हक्काची रक्कम महावितरण कंपनीस अदा करण्यात येईल.
  • वरील घटकांपैकी लाभार्थ्यास कडे काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी खालील आवश्यक घटकांची निवड करावी : पंपसंच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच( ठिबक/ तुषार), पीव्हीसी पाईप, परसबाग.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा (ST) शेतकरी असणे गरजेचे आहे.

लाभार्थ्याकडे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे

लाभार्थी कडे शेतजमिनीचा सातबारा व आठ-अ असणे गरजेचे आहे

नवीन विहीर खोदणे असल्यास शेतकऱ्याकडे किमान एक एकर (0,40 हेक्टर) आणि नवीन विहीर खोदणे हा घटक वगळून योजनेतील अन्य घटकांसाठी किमान अर्धा एकर (0,20 हेक्टर) शेत जमीन असणे आवश्यक आहे. या योजने अंतर्गत सर्व घटकांसाठी कमाल शेत जमीन मर्यादा 6.00 हेक्टर एवढी राहील. 0.40 हेक्टर पेक्षा कमी शेत जमीन असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र येऊन त्यांची एकत्रित जमीन किमान 0.40 हेक्टर इतकी होत असल्यास त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल.

लाभार्थ्याचे बँक खाते असणे व हे बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न असणे गरजेचे आहे.

लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रुपये 150000/-  पेक्षा जास्त नसावे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

वर्गवारी लागणारी कागदपत्रे
नवीन विहिरी साठी
आधार कार्ड
बँक पासबुक ची प्रत
जातीचे प्रमाणपत्र
तहसीलदार यांचे मागील वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
सात/बारा आणि आठ-अ उतारा (सातबारावर तसेच शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास या घटकाचा लाभ घेता येणार नाही).
लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र
अपंग असल्यास प्रमाणपत्र
तलाठी यांचेकडील दाखला- सामाईक एकूण धारणा क्षेत्र बाबतचा दाखला. विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र. प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून 500 फुटांपेक्षा जास्त अंतरावर असल्याचा दाखला. प्रस्तावित विहीर सर्वे नंबर नकाशा व चतुर्सिमा.
कृषी अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र.
गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र.
ज्या जागेवर विहीर खोदण्याची आहे त्या जागेचा फोटो (महत्त्वाच्या खुणांसह व लाभार्थी सह)
ग्रामसभेचा ठराव. 
भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणे मार्फत वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाण पत्र.
नवीन विहिरी च्या कामासाठी अंदाज पत्रक तयार करून त्यास कृषी विकास अधिकारी यांची तांत्रिक मान्यता घ्यावी लागेल.
कामाच्या शेवटच्या हप्त्याचे अनुदान पूर्णत्वाचा दाखला विहिरीचे लाभार्थ्यास सह जीपीएस लोकेशन सह फोटो व मूल्यांकन सादर केल्याशिवाय देय राहणार नाही.
जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी किंवा इनवेल बोरिंग साठीआधार कार्ड
बँक पासबुक ची प्रत
जातीचे प्रमाणपत्र
तहसीलदार यांचे मागील वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
सात/बारा आणि आठ-अ उतारा (सातबारावर विहिरीची नोंद असणे आवश्यक  राहील)
लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र
अपंग असल्यास प्रमाणपत्र
तलाठी यांचेकडील दाखला- सामाईक एकूण धारणा क्षेत्र बाबतचा दाखला. विहीर सर्वे नंबर नकाशा व चतुर्सिमा.
कृषी अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र.
गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र.
ग्रामसभेचा ठराव.
ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह) 
जुनी विहीर दुरुस्तीच्या कामासाठी अंदाज पत्रक तयार करून त्यास कृषी विकास अधिकारी यांची तांत्रिक मान्यता घ्यावी लागेल. विहिरीच्या कामाचे अंदाजपत्रक पेक्षा अधिक रक्कम लागल्यास लाभार्थीने ती स्वतः खर्च करावी लागेल.
जुनी विहीर दुरुस्ती चे काम वेळेत पूर्ण करण्याबाबत शेतकऱ्याकडून बंधपत्र देणे गरजेचे राहील.
नवीन विहीर अथवा जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याने इनवेल बोरिंग ची मागणी केल्यास रुपये 20000 च्या मर्यादेत अनुदान देय राहील.
खर्चाचे अंदाजपत्रक व तांत्रिक निकषानुसार ठिकाणाची योग्यता अहवाल (Feasibility Report) भूजल सर्वेक्षण यंत्रणे कडून घ्यावा लागेल.
शेततळे अस्तरीकरण/वीज जोडणी आकार/ पंपसंच/शेतासाठी सूक्ष्म सिंचन संच/पीव्हीसी पाईप 
आधार कार्ड
बँक पासबुक ची प्रत
जातीचे प्रमाणपत्र
तहसीलदार यांचे मागील वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
सात/बारा आणि आठ-अ उतारा
लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र
अपंग असल्यास प्रमाणपत्र
तलाठी यांचेकडील दाखला- सामाईक एकूण धारणा क्षेत्र बाबतचा दाखला. विहीर सर्वे नंबर नकाशा व चतुर्सिमा.
कृषी अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र.
गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र.
ग्रामसभेचा ठराव.
शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र
काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र 
नवीन विहीर पॅकेज/ जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज/  शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेजमधील तथा आवश्यकतेनुसार फक्त वीज जोडणी ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याने विद्युत वितरण कंपनीकडे कोटेशन भरल्याची पावती जोडावी लागेल.
पंप संचाच्या लाभासाठी शेतकऱ्यांना पंप संच खरेदीकरिता कृषी अधिकारी यांची पूर्वसंमती लागेल. अधिकृत विक्रेत्याकडून पंप संचाची खरेदी केल्यानंतर त्याबाबतचे देयक (Bill/ Invoice) जोडावे लागेल.
पाईप खरेदी करिता कृषी अधिकारी पंचायत समिती यांची पूर्वसंमती लागेल. मान्यताप्राप्त आयएसआय मार्क पाईप ची खरेदी केल्यानंतर त्याबाबतचे देयक जोडावे लागेल.
परसबाग आधार कार्ड
बँक पासबुक ची प्रत
जातीचे प्रमाणपत्र
तहसीलदार यांचे मागील वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
सात/बारा आणि आठ-अ उतारा
शेतकऱ्यांनी भेंडी, गवार, चवळी, दुधी ,भोपळा, शेवगा, काकडी, दोडका इत्यादी बियाण्यांचे किट महाबीज अथवा एनएससी इत्यादी बियाणे उत्पादक कंपनीच्या अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडून खरेदी करून त्याची पावती द्यावी लागेल.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

सर्वप्रथम तुम्हाला कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

होम पेजवर तुम्हाला ‘न्यू यूजर’ या लिंकवर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, तुमच्या जिल्ह्याचे नाव, तालुका, गाव, पिन कोड इत्यादी विचारलेली माहिती टाकावी लागेल.

यानंतर, तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल आणि ओटीपी पाठवाच्या बटणावर क्लिक करावे लागेल.

आता तुम्हाला OTP बॉक्समध्ये OTP टाकावा लागेल.

यानंतर तुम्हाला तुमचे युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.

आता तुम्हाला रजिस्टर बटणावर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे तुम्ही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अर्ज करू शकाल.

पोर्टलवर लॉग इन करण्याची प्रक्रिया

सर्वप्रथम तुम्हाला कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

मुख्यपृष्ठावर, तुम्हाला लॉगिन विभागात वापरकर्ता आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल.

आता तुम्हाला लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे तुम्ही पोर्टलवर लॉग इन करू शकाल

FAQ Section

महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जमातीचे आदिवासी शेतकरी ज्यांच्याकडे शेत जमिनीचा सातबारा व आठ-अ आहे ते बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेऊ शकतील.

या योजनेअंतर्गत नवीन विहिरीचे बांधकाम, जुन्या विहिरींची दुरुस्ती, विहिरीमध्ये बोर, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच (ठिबक/तुषार), प्लास्टिक अस्तरा वरील शेत, परसबाग, पंप संच, पीव्हीसी पाईप या कामांकरिता अनुदान देण्यात येते.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत नवीन विहीर खोदणे असल्यास शेतकऱ्याकडे कमीत कमी एक एकर आणि नवीन विहीर खोदणे हा घटक वगळून योजनेतील अन्य कामांसाठी कमीत कमी अर्धा एकर शेत जमीन असणे गरजेचे आहे. तसेच योजनेअंतर्गत कमाल शेतजमीन मर्यादा 6 हेक्टर एवढी राहील.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत किमान 500/- रुपये आणि कमाल 250000/- (दोन लाख पन्नास हजार) रुपयांचे अनुदान देण्यात येते.

इतर महत्वाच्या योजना देखील बघा :

नवीन सुधारित महाराष्ट्र मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र (MJPJAY) 2023

Share On:

Leave a Comment