वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मनुष्य किंवा पशु मृत/ अपंग/जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ (महाराष्ट्र) 2023। Increased Financial Assistance In Case Of Death/Disability/Injury of Human or Animal Due to Attack by Wild Animals (Maharashtra) 2023

जंगली प्राणी हल्ल्यात देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ | Increase In Compensation To Human/Animals Attacked By Wild Animals

महाराष्ट्र राज्यातील एकूण जमिनीपैकी 16.50% जमिन जंगलांनी व्याप्तआहे. बेकायदेशीर जंगलतोड, वृक्षतोड, भू-कापणी आणि रहिवासी वसाहती आणि पीक जमिनींचा आरक्षित जंगले आणि डोंगराळ प्रदेशांमध्ये विस्तार केल्यामुळे प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास कमी झाला आहे. ज्यामुळे प्राण्यांना अन्नाच्या शोधात भटकंती करावी लागत आहे.  जेव्हा भटके वन्यप्राणी अन्नपाण्यासाठी मानवी रहिवासी वसाहती जवळ येतात तेव्हा त्यांचा सामना मानवांसोबत आणि पाळीव प्राण्यांसोबत होतो. यात मनुष्यांची किंवा पशुधन ( पाळीव प्राणी ) यांची हानी होते. ही हानी भरून देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे अर्थसहाय्य दिले जाते.

वाघ, बिबट्या, रानडुक्कर, अस्वल, तरस, कोल्हा. गवा (बायसन), लांडगा, मगर, रान कुत्रे (ढोल) व हत्ती यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास अर्थसाह्याची रक्कम संबंधितांना देण्यात येते. तसेच वरील उल्लेखित वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे गाय, बैल, म्हैस, मेंढी, बकरी किंवा इतर पशुधन (पाळीव पशू) मृत /अपंग /जखमी झाल्यास अर्थसहाय्याची रक्कम संबंधितास देण्यात येते. वन्य प्राणी हल्ल्यामध्ये मनुष्य तसेच पशुधन मृत /अपंग/ जखमी झाल्यास देण्यात येणारे अर्थसहाय्य कमी असल्यामुळे त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनातर्फे दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आला.

increased compensation in wild attacks

मनुष्य मृत झाल्यास कायम अपंग झाल्यास किंवा जखमी झाल्यास खालील प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येईल

अनु. क्र. बाब
देण्यात येणारेअर्थसहाय्य
1व्यक्ति मृत झाल्यास
रुपये 2000000/-(वीस लाख रुपये फक्त )
रुपये 2000000/- (वीस लाख) पैकी रुपये 1000000/- (दहा लाख ) देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ चेक द्वारे व उर्वरित रक्कम रुपये1000000/- (दहा लाख) त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या  दर महिन्याला व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव रक्कम (फिक्स डिपॉझिट) म्हणून जमा करण्यात येईल.
2व्यक्ती कायम अपंग झाल्यासरुपये 500000/- (पाच लाख रुपये फक्त)
3व्यक्ती गंभीर जखमी झाल्यासरुपये 125000/- (एक लाख पंचवीस हजार फक्त )
4व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास
औषध उपचारासाठी येणारा खर्च देण्यात येईल.
परंतु खाजगी रुग्णालयात उपचार करणे जरुरी असल्यास त्याची मर्यादा रुपये 20000/- (वीस हजार रुपये फक्त ) प्रति व्यक्ती एवढी राहील. शक्यतोवर उपचार हा शासकीय / जिल्हा परिषद रुग्णालयातच करावा.
  • वन्य प्राणी हल्ल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना देय असणाऱ्या अर्थसाह्याच्या रकमेपैकी रुपये 1000000/- (दहा लाख रुपये फक्त) देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ चेक द्वारे व उर्वरित रक्कम दहा लाख पैकी रुपये 500000/- (पाच लक्ष रुपये) पाच वर्षाकरिता फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवावे आणि उर्वरित 500000/- (पाच लक्ष रुपये) दहा वर्षाकरिता फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवावे. दहा वर्षानंतर मृत व्यक्तीच्या वारसांना पूर्ण रक्कम देण्यात येईल.
  • सदर फिक्स डिपॉझिट खाते उघडतेवेळी संबंधित बँकेत संबंधित उप वनसंरक्षक यांचे नाहरकत प्रमाणपत्र तसेच फिक्स डिपॉझिट मधील रक्कम मुदतीच्या आत काढता येणार नाही अशी अट टाकण्यात येईल. परंतु संबंधितांना जर रकमेची तत्काळ आवश्यकता असेल तर त्यांना उप वनसंरक्षक यांच्याकडून मुदतीपूर्व फिक्स डिपॉझिट रक्कम काढण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल.
  • उप वनसंरक्षक संबंधितांना रकमेच्या आवश्यकतेची जसे शिक्षणाकरिता, लग्न समारंभाकरिता गंभीर आजार इत्यादी प्रकरणाच्या वेळेस तसेच काही स्थावर मालमत्ता खरेदी इत्यादी कारणांची चौकशी करतील आणि त्यानंतरच ना हरकत प्रमाणपत्र देतील.

पशुधन (पाळीव प्राणी) मृत /अपंग / जखमी झाल्यास देण्यात येणारे अर्थसहाय्य

अनु. क्र. पशुधन (पाळीव प्राण्याचे) नाव देण्यात येणारे अर्थसहाय्य
1गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास
बाजार भाव किमतीच्या 75 टक्के किंवा 70000/-(सत्तर हजार फक्त ) यापैकी कमी असणारी रक्कम
2मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास [ इतर पशुधनांमध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील कलम 2 (18-अ) प्रमाणे ]बाजार भाव किमतीच्या 75 टक्के किंवा रुपये 15000/– (पंधरा हजार रुपये फक्त) यापैकी कमी असणारी रक्कम
3गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यासबाजार भाव किमतीच्या 50 टक्के किंवा रुपये 15000/-(पंधरा हजार रुपये फक्त) यापैकी जी कमी असेल ती रक्कम
4गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यासऔषधोपचारासाठी लागणारा खर्च देण्यात येईल.
औषधोपचार शासकीय / जिल्हा परिषद पशु चिकित्सालय यात करणे आवश्यक आहे. देण्यात येणारी रक्कम मर्यादा बाजारभावाचे 25% किंवा रुपये 5000 प्रति जनावर यापैकी कमी असणारी रक्कम देण्यात येईल. वरील भरपाई पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे देण्यात येईल.

पशुधनासाठी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्या साठी अटी व शर्ती

  • पशुधन मालकाने पशुधन मेल्यापासून किंवा घटना घडल्यापासून 48 तासाच्या आत जवळील वन अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला कळविणे गरजेचे आहे.
  • वन्य प्राण्यांनी ज्या ठिकाणी जनावर मारले असेल त्या ठिकाणावरून जनावरांचे शव कोणीही हलविता कामा नये. ते त्याच ठिकाणी पडून राहू द्यावे.
  • जनावर ज्या ठिकाणी मृत /अपंग/ जखमी झाले असेल त्या ठिकाणापासून दहा किलोमीटर भागात कोणत्याही वन्य प्राण्याचा सहा दिवसापर्यंत विष देऊन मृत्यू झालेला नसावा.
  • हल्ल्याची बातमी मिळाल्यानंतर संबंधित वन अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तातडीने पंचनामा करणे गरजेचे आहे.\
  • तसेच जनावराचा मृत्यू कोणत्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने झाला याची तपासणी वन क्षेत्रपाल दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात येईल आणि देण्यात येणारी नुकसान भरपाईची रक्कमही त्यांच्याकडूनच ठरविण्यात येईल.
  • जनावर मालकाला देण्यात येणारी अर्थ सहाय्याची रक्कम मंजूर करणे हे सहाय्यक वन संरक्षण या दर्जापेक्षा खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्याला त्याचाअधिकार असणार नाही.
  • अर्थसहाय्याची रक्कम ही एनईएफटी / आरटीजीएस द्वारे संबंधिताच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

इतर योजना/ मंजुरी बघा

Share On:

Leave a Comment