महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना(2023) | Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjamukti Yojana-2019 Antargat Protsahanper Labh Yojana(2023) | 2023 Incentive Benefit Scheme under Mahatma Jyotirao Phule Shetkari Debt Relief Yojana- 2019

50 हजार पर्यंत शेतकरी पीक कर्ज माफी योजना | Rs. 50000 waiver crop loan Maharashtra | Mahatma Jyotirao Phule Farmer loan waiver scheme 2023 | Loan Relief Scheme Maharashtra Farmers

महात्मा ज्योतिराव फुले

भारत हा कृषिप्रधान देश आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण जवळपास दीड कोटी च्या वर शेतकरी आहेत. महाराष्ट्र शासनाद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती करिता अनेक योजना राबविल्या जातात. अशीच एक योजना महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येत आहे जिचे नाव “महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना” असे आहे.

शेती व शेती संलग्न कामाकरिता शेतकरी सरकारी बँक आणि सहकारी बँकांकडून कर्ज घेत असतात. 2015-16 ते 2018-19 या चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली होती. तसेच राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वेळेवर शेती निगडीत कर्जाची परतफेड करू शकला नाही आणि थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या कचाट्यात अडकलेला होता आणि त्यांना शेती कामांकरिता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण  झाल्या होत्या. या परिस्थितीला हाताळण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केलेली होती.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजार पर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्याची योजना घोषणा 2020 च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली होती. परंतु मार्च 2020 पासून संपूर्ण देशात कोविड-19 च्या थैमाणाने राज्य आर्थिक संकटात आल्यामुळे वरील आश्वासनाची पूर्तता करणे शक्य झाले नाही.

त्या पश्चात 2022 च्या अर्थसंकल्पात अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजारापर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्याची सन 2022-23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आलेली होती. त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50 हजार पर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्यास शासनातर्फे 27 जुलै 2022 रोजी मान्यता देण्यात आली.

योजनेअंतर्गत विचारात घेतलेला कालावधी आणि अटी

 • महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेचा लाभ घेण्याकरिता सन 2017-18 , सन 2018-19 आणि सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात आलेला आहे. या तीन आर्थिक वर्षापैकी कुठल्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 • सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2018 पर्यंत पूर्ण परतफेड केलेले असल्यास , सन 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2019 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास , सन 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्ण परतफेड केलेले असल्यास
 • अथवा सन 2017-18 2018-19 व 2019-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्जफेडीचा परतफेडीचा द्येय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांक पूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास अशा शेतकऱ्यांना सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50 हजार पर्यंत प्रोत्साहन रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता दिलेली आहे.
 • मात्र सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये 50 हजार पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका  प्रोत्साहन पर लाभ देण्यास मान्यता  देण्यात आली आहे.
 • वरील प्रोत्साहन पर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल.
 • योजनेला इतर कर्जमाफी योजनेप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येईल.

योजने करिता ठरविण्यात आलेले निकष

 • प्रोत्साहन पर लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल.
 • या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका , खाजगी बँका , ग्रामीण बँका , जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज  विचारात घेण्यात येईल.
 • सन 2019 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
 • तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहन पर योजनेच्या लाभास पात्र असतील.

सदर योजनेचा लाभ मिळण्यास अपात्र व्यक्ती

 • ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे ते शेतकरी सदर योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
 • महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री ,आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य , आजी/माजी विधानसभा/विधानपरिषद सदस्य हे या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार नाहीत.
 • केंद्र अथवा राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असतील. (मात्र एकत्रित मासिक वेतन  रुपये 25000/- पेक्षा जास्त असणारे  चतुर्थश्रेणी कर्मचारी हे या योजनेचा लाभ घेऊ शकतील).
 • राज्य सार्वजनिक उपक्रम ( उदाहरणार्थ महावितरण , एसटी महामंडळ इत्यादी ) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी हे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसतील. ( मात्र एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थश्रेणी कर्मचारी हे या योजनेचा लाभ घेऊ शकतील )
 • शेती व्यतिरिक्त उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती या योजनेसाठी अपात्र असतील.
 • निवृत्ती वेतनधारक पेन्शन धारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25000/- पेक्षा जास्त आहे ते या योजनेअंतर्गत अपात्र असतील. ( परंतु माजी सैनिकांना या योजनेचा लाभ घेता येईल )
 • नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी यांचे अधिकारी आणि पदाधिकारी (ज्यांचे एकत्रित मासिक वेतन रुपये पंचवीस हजार पेक्षा जास्त आहे) ते या योजनेस चा लाभ घेण्यास अपात्र असतील.

योजनेसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची निवड करण्यात आली

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना या योजनेसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या निवडीस शासनाने मान्यता दिलेली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे खालील कामे करण्यात येतील

 • शासकीय निधीचे व्यवस्थापन.
 • योजनेमधील लाभाच्या रकमेचे थेट लाभार्थ्याच्या कर्ज खात्यामध्ये हस्तांतरण.
 • ग्राहक सहाय्य.
 • अहवाल निर्मिती.
 • निधी हस्तांतरणाची पोचपावती आणि त्याचा ताळमेळ.
 • विविध बँका व प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांकडे योजनेबद्दल सतत पाठपुरावा करणे.
 • एसएमएस ई-मेलद्वारे योजनेची माहिती देणे.
 • निधीवर देखरेख ठेवणे इत्यादी.

सूचना

जे शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना या योजने करिता पात्र आहेत आणि ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ज्या बँका किंवा प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेकडून कर्ज घेतलेले होते आणि अजूनही कर्जाची परतफेड झालेली नाही त्यांनी त्या संबंधित बँकेमध्ये किंवा प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेकडे कडे जाऊन या योजनेबद्दल चौकशी करावी आणि योजनेचा लाभ घ्यावा.

नेहेमी विचारल्या जाणारे प्रश्न

वरील प्रोत्साहन पर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये पन्नास हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहन पर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल.

जे शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना या योजने करिता पात्र आहेत आणि ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ज्या बँका किंवा प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेकडून कर्ज घेतलेले होते आणि अजूनही कर्जाची परतफेड झालेली नाही त्यांनी त्या संबंधित बँकेमध्ये किंवा प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेकडे कडे जाऊन या योजनेबद्दल चौकशी करावी आणि योजनेचा लाभ घ्यावा.

 

इतर महत्वाच्या योजना बघा :

महिला स्वयंसिद्ध व्याज परतावा योजना

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र (MJPJAY) 2023

नवीन सुधारित महाराष्ट्र मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2023

Share On:

Leave a Comment