महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना-2023 | Maharashtra Krishi Yantrikikaran Yojana-2023 | Maharashtra State Agricultural Mechanization Scheme-2023 | New Maharashtra Subsidy Scheme Farming Machines-2023

कृषी यांत्रिकीकरण योजना माहिती | कृषी अवजारे/यंत्रे खरेदीसाठी अनुदान योजना | Subsidy Scheme Agricultural Implements/Machinery list PDF | विविध अवजारे/यंत्रे यादी आणि अनुदान PDF

भारत हा कृषिप्रधान देश आहे. महाराष्ट्र राज्यातही शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नती करिता अनेक योजना राबविल्या जातात. अशीच एक योजना महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येत आहे जिचे नाव “राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना” असे आहे. शेतीचे काम करताना शेतकऱ्यांना मजुरांचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो आणि सध्या मजुरीचे दर व त्यामुळे शेतीसाठी येणारा खर्च बराच प्रमाणात वाढलेला आहे. मजुरांच्या अभावामुळे शेतीची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत आणि शेवटी शेतीतून मिळणारे उत्पन्न हे फार कमी येतं. त्यामुळे शेती करणे आजच्या घडीला खूप कठीण झालेले आहे. यावर उपाय म्हणून शासनातर्फे राज्य कृषी यांत्रिकीकरण ही योजना सुरू करण्यात आली.

पारंपारिक शेती करताना लागणारा खर्च कमी करून उत्पादनामध्ये वाढ करण्याकरिता आधुनिक पद्धतीने यंत्रांचा उपयोग करून शेती करणे गरजेचे आहे त्यासाठी पेरणी कापणी नंतरची प्रक्रिया यंत्राद्वारे करणे आवश्यक आहे शेतीसाठी यंत्रांचा वापर करून उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे शक्य होईल.

प्रमुख वैशिष्ट्ये

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेचे उद्देश

शेतीसाठी लागणारे यंत्र किंवा अवजारे शेतकरी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे खरेदी करू शकत नाहीत. त्यासाठी केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे धोरण अवलंबिले आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून कृषी यांत्रिकीकरणा करिता अनेक योजना राबविण्यात येतात. परंतु मागणी जास्त असल्यामुळे या योजनांमधून शेतकऱ्यांना कृषी अवजारांचा पुरवठा करणे शक्य होत नाही.

तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये ट्रॅक्टर, ऊस कापणी यंत्र, पावर टिलर यासारख्या जास्त किमतीच्या यंत्रांना अनुदान मिळत नाही. या यंत्रांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे केंद्र शासनाची कृषी यांत्रिकीकरण योजना प्रभावीपणे राबविणे शक्य होत नाही. त्याकरिता राज्य शासनाने आपली स्वतंत्र कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण दोन किलोवॅट प्रति हेक्टर पर्यंत वाढविणे हे शासनाचे प्रमुख उद्देश आहे.

कृषी उपयोगी यंत्रे

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

 • शेतकरी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
 • शेतकऱ्याकडे स्वतःची शेती असणे गरजेचे आहे.
 • फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/अवजार.
 • एखाद्या घटकासाठी/अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/अवजारासाठी पुढील दहा वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर अवजारासाठी अर्ज करता येईल.
 • कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टरला लागणाऱ्या अवजारासाठी लाभ मिळण्यास तो शेतकरी पात्र असेल परंतु त्याकरिता ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडावा लागेल

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठीलागणारी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड.
 • ७/१२ उतारा.
 • ८-अ दाखला.
 • खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल.
 • जातीचा दाखला ( अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती साठी )
 • स्वयं घोषणापत्र.
 • पूर्वसंमती पत्र.

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येणारे कृषी यंत्र/अवजारे

 • ट्रॅक्टर
 • पावर टिलर
 • ट्रॅक्टर/पावर टिलर चलित अवजारे
 • मनुष्य चलित यंत्र/अवजारे
 • बैलचलित यंत्र अवजारे
 • प्रक्रिया संच
 • कापणी पश्चात प्रक्रिया यंत्र
 • फलोत्पादन यंत्र/अवजारे
 • वैशिष्ट्यपूर्ण यंत्र/अवजारे
 • स्वचलित यंत्रे

कुठल्या यंत्रांकरिता किती अनुदान मिळेल याची यादी खालील PDF मध्ये बघा किंवा डाऊनलोड करा

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना कार्यान्वयन आणि अटी

 • सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अनुदान असलेल्या यंत्र व अवजारांसाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल.
 • हे अनुदान लाभार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने अदा करण्यात येईल.
 • ज्या शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियान किंवा इतर योजना अंतर्गत अवजारे/यंत्रे यांच्या मागणीसाठी अर्ज केलेला होता परंतु निधी अभावी त्यांना अवजारे/यंत्रे मंजूर करणे शक्य झाले नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेमधून उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत पूर्वसंमती देऊन योजनेचा लाभ देण्यात येईल.
 • पूर्वसंमती दिलेल्या पात्र लाभार्थ्याने केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम संस्थांनी ज्या यंत्र/अवजारांचे रीतसर परीक्षण करून ते BIS अथवा अन्य सक्षम संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार असल्याचे प्रमाणित केले असेल त्याच यंत्र/अवजारांची पूर्वसंमती प्राप्त लाभार्थी शेतकऱ्यांनी खरेदी करावयाची आहे.
 • पूर्वसंमती नसताना जर शेतकऱ्याने यंत्र अवजारांची खरेदी करून अनुदानासाठी अर्ज सादर केला असेल तर असा शेतकरी अनुदानासाठी पात्र असणार नाही.
 • या योजने अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. अधिकृत वेबसाईट – www.mahadbtmahait.gov.in

तुमच्या पुढे खालील पेज उघडेल

त्यानंतर तुम्हाला वरील पेजवर उजव्या बाजूला असलेल्या “शेतकरी योजना” वर क्लिक करावे लागेल. आता तुमच्या पुढे खालील पेज उघडेल.

 जर तुम्ही नवीन अर्जदार असाल तर तुम्हाला आधी “ नवीन अर्जदार नोंदणी “ यावर क्लिक करावे लागेल.  “ नवीन अर्जदार नोंदणी “ यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे खालील पेज ओपन होईल. तुम्ही जर जुने अर्जदार असाल तर “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा.

 • वरील पेज वर तुम्हाला अर्जदाराचे नाव भरावे लागेल. त्यानंतर वापरकर्त्याचे नाव (लॉगिन आयडी) आणि पासवर्ड दिलेल्या सूचना नुसार प्रविष्ट करावा लागेल.
 • त्यानंतर जर तुमचा ईमेल आयडी असेल तर तो प्रविष्ट करून “ईमेल आयडी ची सत्यता तपासणीकरिता ओटीपी मिळवा” वर क्लिक करावे लागेल आणि तुमच्या ईमेल आयडी वर आलेला ओटीपी प्रविष्ट करून “ओटीपी तपासा” वर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून “मोबाइल क्रमांकाची सत्यता तपासणीकरिता ओटीपी मिळवा” वर क्लिक करावे लागेल आणि तुमच्या मोबाईल वर आलेला ओटीपी प्रविष्ट करून “ओटीपी तपासा” वर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर प्रतिमेत दर्शविलेले शब्द (captcha) प्रविष्ट करून “नोंदणी करा” वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ओके वर क्लिक करून पुढे जावे लागेल.
 • आता खालील पेजवर तुम्ही लॉगिन चा प्रकार निवडून लॉगिन करू शकाल.
 • वापरकर्ता आयडी मध्ये तुम्हाला जो तुम्ही वरील प्रमाणे लॉगिन आयडी आणि पासवर्ड सेट केलेला आहे तो प्रविष्ट करून लॉगिन करता येईल.
 • किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करून सुद्धा तुम्ही लॉगिन करू शकाल. आधार क्रमांक प्रविष्ट केल्यावर ओटीपी वर क्लिक केल्यानंतर “ओटीपी पाठवा” वर क्लिक करावे लागेल. हा ओटीपी तुमच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येईल तो प्रविष्ट करून “ओटीपी तपासा” वर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला तुमचे प्रोफाइल (वैयक्तिक माहिती) संपूर्णपणे भरावी लागेल. सर्व * चिन्हांकित माहिती भरणे अनिवार्य राहील जसे संपूर्ण नाव, जातीचा तपशील, आधार संलग्न बँक खात्याची माहिती, कायमचा पत्ता, पत्रव्यवहाराचा पत्ता, शेत जमिनीचा तपशील इत्यादी माहिती भरून आपण आपले प्रोफाईल स्थिती 100% पूर्ण करणे गरजेचे आहे.
 • लॉगिन झाल्यावर खालील पेज उघडेल.

अर्ज करा वर क्लिक केल्यानंतर खालील पेज उघडेल

कृषी यांत्रिकीकरण या घटक अंतर्गत तुम्हाला ” राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना “ ही बाब निवडावी लागेल आणि नंतर अर्ज सादर करा वर क्लिक करावे लागेल. अर्जात नमूद सगळ्या बाबी नीट भरून अर्ज सादर करावा लागेल.

नेहेमी विचारल्या जाणारे प्रश्न

योजनेंतर्गत फक्त एकाच अवजारासाठी अर्ज स्वीकारण्यात येईल. म्हणजे ट्रॅक्टर किंवा यंत्र/अवजारे. कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या नावे ट्रॅक्टर असेल तर तो ट्रॅक्टर ला लागणाऱ्या अवजारांसाठी अर्ज करू शकतो.

होय शासनाकडून पूर्वसंमती घेणे आवश्यक आहे. पूर्वसंमती नसताना जर शेतकऱ्याने यंत्र अवजारांची खरेदी करून अनुदानासाठी अर्ज सादर केला असेल तर असा शेतकरी अनुदानासाठी पात्र असणार नाही.

इतर महत्वाच्या योजना बघा :

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र (MJPJAY) 2023

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना

नवीन सुधारित महाराष्ट्र मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना

Share On:

Leave a Comment