नवीन सुधारित महाराष्ट्र मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2023 | New Updated Maharashtra Mukhyamantri Shashwat Krushi Sinchan Yojana 2023

महाराष्ट्र मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना माहिती | Mukhymantri shaswat Krishi sinchan yojana online application | ठिबक व तुषार सिंचनासाठी 80 टक्के पर्यंत अनुदान | Upto 80% grant on drip & sprinkler irrigation

कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध सिंचन योजना राबवल्या जातात. अशीच एक सिंचन योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे तिचं नाव “मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना” असे आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना संबंधित सर्व महत्त्वाची माहिती देणार आहोत जसे की या योजनेचे फायदे, उद्देश, पात्रता, वैशिष्ट्ये, महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इत्यादी.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना उद्देश

महाराष्ट्र शासनाने 19 ऑगस्ट 2019 रोजी कोरडवाहू शेती अभियानाअंतर्गत अवर्षण प्रवण क्षेत्रातील (Rainfed Area/दुष्काळग्रस्त भाग) शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, कोरडवाहू शेती अभियानामध्ये बदल करून “मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना” अवर्षण प्रवण क्षेत्राबरोबरच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला होता. या योजने नुसार अवर्षणप्रवण घोषित 149 तालुके तसेच अमरावती व औरंगाबाद महसूल विभागातील सर्व व नागपूर विभागातील वर्धा या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आणि केंद्र शासनाने नक्षलग्रस्त म्हणून घोषित केलेल्या चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर सदर योजना सन 2021-22 पासून राज्यातील उर्वरित 107 तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाद्वारे 18 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आला. आता ही योजना महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांत राबवण्यात येत आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना (पाच हेक्टर पर्यंत) 45 टक्के अनुदान देण्यात येते. या अनुदानाच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान उपलब्ध करून सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80 टक्के व 75 टक्के एकूण अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

drip irrigation
ठिबक सिंचन

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत दिलेले लाभ आणि आर्थिक मदत

अनु. क्र कुठल्या कामाकरिता अनुदान रक्कम 
1सूक्ष्म सिंचन :
i)ठिबक सिंचन
ii)तुषार सिंचन
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना देय 55% अनुदानास पूरक अनुदान 25% देऊन 80 टक्के अनुदान देण्यासाठी व इतर शेतकऱ्यांना (पाच हेक्टर पर्यंत) देय 40% अनुदानास 30% पूरक अनुदान देऊन एकूण 75 टक्के अनुदान देण्यासाठी आवश्यक निधीच्या मर्यादेत.
2वैयक्तिक शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरणएकूण प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 75000 यापैकी जे कमी असेल ते.
3हरित गृह उभारणे (1000 चौरस मीटर क्षेत्र मर्यादा) रू. 100000/- (एक लाख रुपये) 

4शेडनेट हाऊस उभारणे
(1000 चौरस मीटर क्षेत्र मर्यादा)
 रू. 100000/- (एक लाख रुपये) 

अर्जदार शेतकऱ्यांना वरीलपैकी सर्व बाबींचा किंवा त्यांना आवश्यक असेल तेवढ्या बाबींकरिता लाभ घेता येईल. सदर योजनेअंतर्गत विविध बाबींकरिता वरील नमूद केलेले अनुदान हे कमाल स्वरूपात असून संबंधित बाबी करिता केंद्र शासनाने सुचवलेल्या मापदंडानुसार प्रत्यक्षात येणारा खर्च किंवा वरील उच्चतम अनुदान मर्यादेची रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढ्या रकमेच्या अनुदानास अर्जदार शेतकरी पात्र राहतील.

तुषार सिंचन

योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता

 • अर्जदार शेतकऱ्याच्या नावे जमिनीचा 7/12 व 8-अ उतारा असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराने अर्जासोबत ज्या जमिनीचा उतारा किंवा दाखला दिला असेल त्याच जमिनीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
 • अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांनी जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
 • लाभार्थ्याचे बँक खाते असणे व हे बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न असणे गरजेचे आहे.
 •  या योजने अंतर्गत सर्व घटकांसाठी कमाल शेत जमीन मर्यादा 5.00 हेक्टर एवढी राहील.

 लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्डची झेरॉक्स प्रत.
 • 7/12 उतारा.
 • 8-अ उतारा.
 • अर्जदाराने नुकतेच काढलेले छायाचित्र.
 • आधार संलग्न असलेल्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत.
 • अनुसूचित जाती/जमातीच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत जात प्रमाणपत्र.
 • लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.
 • सामाईक एकूण धारणा क्षेत्र बाबतचा तलाठी यांचेकडील दाखला.
 • शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र.
 • काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
 • अधिकृत विक्रेत्याकडून सूक्ष्म सिंचन संच / पंपसंच खरेदी केल्यानंतर त्याबाबतचे देयक (Bill/ Invoice) जोडावे लागेल.

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ( वेबसाईट ) जावे  लागेल. तुमच्या पुढे खालील पेज ओपन होईल.

 जर तुम्ही नवीन अर्जदार असाल तर तुम्हाला आधी “ नवीन अर्जदार नोंदणी “ यावर क्लिक करावे लागेल.  “ नवीन अर्जदार नोंदणी “ यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे खालील पेज ओपन होईल.

 • वरील पेज वर तुम्हाला अर्जदाराचे नाव भरावे लागेल. त्यानंतर वापरकर्त्याचे नाव (लॉगिन आयडी) आणि पासवर्ड दिलेल्या सूचना नुसार प्रविष्ट करावा लागेल.
 • त्यानंतर जर तुमचा ईमेल आयडी असेल तर तो प्रविष्ट करून “ईमेल आयडी ची सत्यता तपासणीकरिता ओटीपी मिळवा” वर क्लिक करावे लागेल आणि तुमच्या ईमेल आयडी वर आलेला ओटीपी प्रविष्ट करून “ओटीपी तपासा” वर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून “मोबाइल क्रमांकाची सत्यता तपासणीकरिता ओटीपी मिळवा” वर क्लिक करावे लागेल आणि तुमच्या मोबाईल वर आलेला ओटीपी प्रविष्ट करून “ओटीपी तपासा” वर क्लिक करावे लागेल.
 •  त्यानंतर प्रतिमेत दर्शविलेले शब्द (captcha) प्रविष्ट करून “नोंदणी करा” वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ओके वर क्लिक करून पुढे जावे लागेल.
 • आता खालील पेजवर तुम्ही लॉगिन चा प्रकार निवडून लॉगिन करू शकाल.
 • वापरकर्ता आयडी मध्ये तुम्हाला जो तुम्ही वरील प्रमाणे लॉगिन आयडी आणि पासवर्ड सेट केलेला आहे तो प्रविष्ट करून लॉगिन करता येईल.
 • किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करून सुद्धा तुम्ही लॉगिन करू शकाल. आधार क्रमांक प्रविष्ट केल्यावर ओटीपी वर क्लिक केल्यानंतर “ओटीपी पाठवा” वर क्लिक करावे लागेल. हा ओटीपी तुमच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येईल तो प्रविष्ट करून “ओटीपी तपासा” वर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला तुमचे प्रोफाइल (वैयक्तिक माहिती) संपूर्णपणे भरावी लागेल. सर्व * चिन्हांकित माहिती भरणे अनिवार्य राहील जसे संपूर्ण नाव, जातीचा तपशील, आधार संलग्न बँक खात्याची माहिती, कायमचा पत्ता, पत्रव्यवहाराचा पत्ता, शेत जमिनीचा तपशील इत्यादी माहिती भरून आपण आपले प्रोफाईल स्थिती 100% पूर्ण करणे गरजेचे आहे.
 • त्यानंतर आपल्याला ठिबक / तुषार सिंचनाचा उपयोग ज्या पिकांसाठी करावयाचा आहे त्या “पिकांचा तपशील सादर करा” यावर क्लिक करुन पिकांचा संपूर्ण तपशील भरावा लागेल.
 • त्यानंतर “मुख्यपृष्ठ” वर क्लिक केल्यावर आपल्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर “अर्ज करा” वर आपल्याला क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर सिंचन साधने व सुविधा या घटकांतर्गत तुम्हाला सदर योजना निवडून त्यावर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर बाबी निवडा वर क्लिक करून ओपन झालेल्या पेजवर संपूर्ण माहिती भरून “जतन करा” यावर क्लिक करावे लागेल.
 • नंतर “मेन्यूवर जा” यावर क्लिक करून “अर्ज सादर करा” वर क्लिक करावे लागेल’ शेवटी तुम्हाला Make Payment वर क्लिक करून Wallet/Net Banking/Credit-Debit card/ IMPS/UPI यापैकी कुठलाही पर्याय निवडून पेमेंट करावे लागेल.

अशाप्रकारे आपण ठिबक व तुषार सिंचनासाठी सदर योजनेअंतर्गत अर्ज करू शकाल.

FAQ Section

या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील शेतकरी ज्यांच्याकडे पाच हेक्‍टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन असेल ते घेऊ शकतील.

होय प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे अनुदान देण्यात येते त्या अनुदानाच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत पूरक अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येते.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, वैयक्तिक शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, हरितगृह उभारणी, शेडनेट हाऊस उभारणी या कामांकरिता पूरक अनुदान देण्यात येते.

इतर महत्वाच्या योजना देखील बघा :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) 2023

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र (MJPJAY) 2023

Share On:

1 thought on “नवीन सुधारित महाराष्ट्र मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2023 | New Updated Maharashtra Mukhyamantri Shashwat Krushi Sinchan Yojana 2023”

Leave a Comment