पेन्शनधारक / कुटुंब पेन्शनधारकांना दिनांक 01 जुलै 2022 पासून 38% महागाई वाढ मंजूर | Dearness Relief Increase To 38% On Pension/Family Pension w.e.f. January 2023

महाराष्ट्र पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मंजूर जानेवारी 2023 | Maharashtra Pension Increment Decided January 2023 | महाराष्ट्र पेन्शन धारकांना 4% जास्त महागाई वाढ मंजूर

महाराष्ट्र शासनाद्वारे राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना भेटत असलेल्या पेन्शनमध्ये महागाईनुसार वाढ करण्याचा निर्णय 11 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आला. सतत वाढत असलेल्या महागाईमुळे अडचणींना सामोरे जाणाऱ्या पेन्शन धारकांना या निर्णयामुळे बराच दिलासा मिळालेला आहे.

maharashtra pension increase

शासनाचा निर्णय

राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या पेन्शन धारकांना / कुटुंब पेन्शन धारकांना त्यांना मिळत असलेल्या मूळ पेन्शनच्या एकूण रकमेवर अगोदर महागाई वाढीचा दर 34% ठरलेला होता. परंतु शासनाने दिनांक 11 जानेवारी 2023 पासून हा महागाई वाढीचा दर 34% वरून 38% करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ही वाढीव 4% महागाई वाढ दिनांक 01 जुलै 2022 पासूनच्या थकबाकी सह जानेवारी 2023 च्या पेन्शन / कुटुंब पेन्शन सोबत देण्यात येणार आहे.

सदर शासन मंजुरीचा लाभ घेण्यास पात्र पेन्शनधारक

  • राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेले पेन्शनधारक अथवा कुटुंब पेन्शनधारक.
  • जिल्हा परिषदेचे पेन्शनधारक / कुटुंब पेन्शनधारक यांनाही हा निर्णय लागू राहील.
  • ज्यांना पेन्शन योजना लागू केलेली आहे अशा मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी / कृशेतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय यामधील पेन्शनधारक / कुटुंब पेन्शन धारक यांनाही हा निर्णय लागू राहील. 

संक्षिप्त माहिती

निर्णयपेन्शनधारक / कुटुंब पेन्शनधारकांना दिनांक 01 जुलै 2022 पासून 38 % महागाई वाढ मंजूर
विभाग वित्त विभाग , महाराष्ट्र शासन
दिनांक 11 जानेवारी 2023
लाभ महागाई वाढीचा दर 34% वरून 38% करण्यात आला
लाभार्थी राज्य शासकीय सेवेतून निवृत्त झालेले पेन्शनधारक अथवा कुटुंब पेन्शनधारक
Share On:

Leave a Comment