महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व प्रकारच्या बसेस मध्ये प्रवासात सवलत मंजुरी | Discount Sanctioned Senior Citizens Maharashtra ST Buses Travel 2023

75 वर्षे जेष्ठ नागरिक एसटी प्रवास मोफत | 75 Years Old Citizens Free Travel ST Buses | 50% Discounted Bus Fare 65-75 Years Citizens

महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांकरिता अनेक उपयोगी योजना राबविण्यात येतात. ज्येष्ठ नागरिकांचे वय लक्षात घेता आणि त्यांचे उत्पन्न लक्षात घेता त्यांना त्यांचे जीवन सुरळीत आणि समाधानी व्हावे हेच शासनाचे उद्देश असते. अशीच एक योजना महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येत आहे जिच्याद्वारे ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये प्रवासात मोठ्या प्रमाणात सवलत मिळणार आहे.

Maharashtra ST Bus Free Travel

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा केली होती. त्या घोषणेनुसार या सवलत योजनेला महाराष्ट्रात राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी मंजुरी देण्यात आली.

ज्येष्ठ नागरिकांचे वय आणि सवलत

75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकएसटी बसेस मध्ये मोफत प्रवास
65 ते 75 वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ नागरिक50 टक्के प्रवास सवलत (अर्धे तिकीट)

वय निर्धारणासाठी ग्राह्य ओळखपत्रे

  • आधार कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • पासपोर्ट
  • निवडणूक कार्ड
  • शासकीय सेवानिवृत्ती ओळखपत्र (ओळखपत्रात फोटो , जन्मतारीख , रहिवासी पत्ता असणे गरजेचे आहे )
  • एसटी महामंडळाद्वारे देण्यात येणारे ओळखपत्र ( स्मार्टकार्ड )

संक्षिप्त माहिती

निर्णय महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये प्रवासात सवलत मंजुरी
दिनांक 6 सप्टेंबर 2022
विभाग गृह विभाग, महाराष्ट्र शासन
लाभार्थी 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक
लाभ 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटी बसेस मध्ये मोफत प्रवास.
65 ते 75 वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ नागरिकांना 50 % प्रवास सवलत (अर्धे तिकीट).

इतर योजना / मंजुरी बघा

Share On:

Leave a Comment