महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना सुधारित  2023 (SC/VJ/NT/OBC/SBC च्या विद्यार्थ्यांसाठी) | Tuition Fees Reimbursement Scheme Updated 2023 (For SC/VJ/NT/OBC/SBC Students) | Maharashtra Shaikshanik Shulka Pratipurti Yojana 2023

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना माहिती पात्रता अटी | अनु. जाती विमुक्त जाती भटक्या जमाती ओबीसी एसबीसी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती बाबतचे अभ्यासक्रम | Courses Under Maharashtra Tution Fees Reimbersement Scheme | Maharashtra Tution Fees Refund Scheme For SC/VJ/NT/OBC/SBC Students

महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना

महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे तसेच शिक्षण शुल्का अभावी त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी शासनाकडून निरंतर प्रयत्न केले जातात. या उद्देशापोटी शासनातर्फे 2006-07 या शैक्षणिक वर्षापासून शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कृषी विभाग ,वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिकाराखाली येणाऱ्या मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करण्यासाठी निर्णय घेण्यात आला.

सदर योजना ही दिनांक 31 मार्च 2016 पासून अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करण्यास शासनातर्फे मुदतवाढ देण्यात आली.

शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना

योजना अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले अभ्यासक्रम

 • आरोग्य विज्ञान पदवी (DEGREE) अभ्यासक्रमा अंतर्गत : वैद्यकीय, दंत, होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद, भौतिकोपचार, व्यवसायोपचार व नर्सिंग अभ्यासक्रम.
 • उच्च व तंत्रशिक्षण अभ्यासक्रम :
पदविका (Diploma)अभियांत्रिकी (Engineering), औषध निर्माण(Pharmacy), एच.एम.सी.टी. (Hotel Management)
पदवी (Degree/Graduation)अभियांत्रिकी (Engineering), औषध निर्माण(Pharmacy), एच.एम.सी.टी. (Hotel Management) , वास्तुशास्त्र.
पदव्युत्तर पदवी (Post Graduation) एम.बी.ए. / एम.एम.एस. , एम.सी.ए.

 • कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय अभ्यासक्रमांतर्गत शासकीय कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती खालील अभ्यासक्रमांसाठी लागू राहील.

कृषी विद्यालय पदविका (Diploma)

दुग्धव्यवसाय विकास – पदविका (Diploma)

कृषी व संलग्न विषयांची महाविद्यालयेपदवी व पदव्युत्तर(Graduation / Post Graduation)

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयेपदवी व पदव्युत्तर

कृषी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयेपदवी व पदव्युत्तर

 • बी.एड. व डी.एड. अभ्यासक्रम

ही योजना बघा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2022: नोंदणी आणि माहिती 

योजनेअंतर्गत पात्रता, अटी व शर्ती

 • विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
 • विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे (दोन्ही पालकांचे एकत्र) उत्पन्न 4.50 लाखाच्या वर नसावे.प्रथम वर्ष योजनेचा लाभ घेतल्यास ही सवलत अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरू राहील.
 • राज्यातील मान्यताप्राप्त विनाअनुदानित व कायम अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये व्यवसायिक शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क ची 100% प्रतिपूर्ती तसेच इतर मागास वर्गांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क ची 50% प्रतिपूर्ती करण्यात येईल.
 • योजनेचा लाभ फक्त शासकीय कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच लागू राहील.
 • आरक्षणाचा लाभ न घेता खुल्या जागांवर प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
 • तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत अभ्यासक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या सेन्ट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसिजर(CAP)द्वारे प्रवेश घेतला असेल त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
 • AIEEE कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
 • जर एखादा विद्यार्थी कुठल्याही अन्य योजनेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती अथवा शुल्क प्रतिपूर्ती चा लाभ घेत असेल तो विद्यार्थी या योजनेकरिता पात्र असणार नाही.
 • विद्यार्थ्यांची महाविद्यालयात / कॉलेजमध्ये वर्गात उपस्थिती अनिवार्य आहे तसेच प्रत्येक सत्राची (सेमिस्टर) किंवा वार्षिक परीक्षा देणे आवश्यक आहे.
 • पात्र विद्यार्थ्याने एखाद्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा दिली नसल्यास किंवा एखाद्या शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्या वर्षासाठी प्रवेश मिळाला नसल्यास पुढील वर्षाकरिता या योजनेअंतर्गत सदर विद्यार्थी तो पात्र असणार नाही. परंतु त्यानंतर जर परत तो विद्यार्थी सत्र परीक्षा किंवा किंवा वार्षिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा अंशतः पास (ATKT) झाला असल्यास त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाल्यास सदर योजनेतील लाभासाठी पात्र असेल.
 • जो विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या एकूण कालावधीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळी पूर्णपणे अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाला नसेल तर संबंधित विद्यार्थी त्या अभ्यासक्रमाच्या उर्वरित कालावधी साठी योजनेअंतर्गत कायमस्वरुपी अपात्र ठरविण्यात येईल.

लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी प्रवेश घेताना पालकांचा (दोन्ही पालकांचे  एकत्र) उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांच्याकडून घ्यावा लागेल.
 • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate).
 • अनुसूचित जाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सक्षम अधिकाऱ्याकडून मिळालेला जातीचा दाखला.

योजनेंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया 

योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्याला वरील लागणारी संपूर्ण महत्वाची कागदपत्रे तो शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयात / कॉलेज अथवा संस्थेमध्ये जमा करावे लागतील. विद्यार्थ्यांचा अर्ज हा संस्थेमार्फत / महाविद्यालयांमार्फतच शासनाकडे मंजुरी साठी पाठविण्यात येतो.

योजनेबद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास इथे क्लिक करा

FAQ Section

महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ अनुसूचित जाती(SC), विमुक्त जाती(VJ) , भटक्या जमाती(NT) , इतर मागास वर्ग(OBC) व विशेष मागास प्रवर्गातील(SBC) जे विद्यार्थी इयत्ता बारावी नंतर उच्च शिक्षण घेऊ इच्छितात ते घेऊ शकतात.

महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कृषी विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिकारा खाली येणाऱ्या मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करण्यात येईल.

होय. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकत्र उत्पन्न 4.50 लाख(चार लाख पन्नास हजार) च्या वर नसावे.

इतर महत्वाच्या योजना बघा :

माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र (MJPJAY) 2023

महाराष्ट्र मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम 2023

Share On:

Leave a Comment