महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र (MJPJAY) 2023 | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana (MJPJAY) 2023

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Apply | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती | MJPJAY Hospital Search | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Diseases Covered

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील रहिवाशांसाठी राबविण्यात येणारी एक आरोग्य विमा योजना आहे. राज्यात यापूर्वी सुरू असलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला विराम देऊन आणि  त्यात आवश्यक ते सुधार करून नव्या रीतीने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना दिनांक 2 ऑक्टोबर 2016 पासून राबविण्यात आली. या योजनेद्वारे राज्यातील नागरिकांना शाश्वत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण आहे.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनाशी संलग्न करून दोन्ही योजना दिनांक 01 एप्रिल 2020 पासून राज्यात राबविण्यात येत आहेत. या योजने अंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रुपये 150000/-( दीड लाख ) पर्यंत मेडिकल व सर्जिकल उपचार तसेच किडनी प्रत्यारोपणासाठी रुपये 250000/- (अडीच लाख ) पर्यंत उपचाराचा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष रुपये 500000/- ( पाच लक्ष ) पर्यंत उपचाराचा लाभ मिळेल.  या लेखाद्वारे आम्ही आपणास या योजने बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत जसे की योजनेचे उद्देश, लाभ घेण्यास पात्र लाभार्थी, लागणारी महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, रुग्णालयांची यादी आणि समाविष्ट केलेले आजार इत्यादी.

MJPJAY logo

प्रमुख वैशिष्ट्ये

योजनेचे उद्दिष्ट

एकत्रित ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र्य रेषेवरील कुटुंबांना विविध गंभीर आजारांवर मोफत उपचार प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. राज्यातील जास्तीत जास्त रुग्णालयांचा समावेश या योजनेत करून अधिकतर रुग्णांना जवळच्याच रूग्णालयात उपचार मिळावा हे शासनाचे उद्देश्य आहे. त्याकरिता शासनाने शासकीय रुग्णालयां सोबतच खाजगी रुग्णालयांचाही यामध्ये समावेश केलेला आहे. कोविंड-19 तसेच म्युकरमायकोसीस या साथ रोगाच्या आजारावरील उपचारही या योजनेअंतर्गत समाविष्ट करून राज्यातील सर्व नागरिकांना  याचा लाभ घेता यावा आणि उपचाराचा आर्थिक भार नागरिकांवर पडू नये हे शासनाचे उद्देश्य आहे.

लाभ घेण्यास पात्र लाभार्थी

 • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे ज्यांच्याकडे पिवळ्या रंगाची शिधापत्रिका ( रेशन कार्ड ) आहे.
 • दारिद्र्य रेषेवरील कुटुंबे ज्यांच्याकडे केशरी रंगाची शिधापत्रिका ( रेशन कार्ड ) आहे.
 • अन्नपूर्णा योजना तसेच अंत्योदया अन्न योजना शिधापत्रिका धारक कुटुंबे.
 • बांधकाम कर्मचारी व त्यांची कुटुंबे.
 • औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा असे एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका असणारे शेतकऱ्यांची कुटुंबे.
 • शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी.
 • महिला आश्रमातील महिला.
 • वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक.
 • अनाथालयातील मुले.

लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

 • पासपोर्ट साईज फोटो.
 • आधार कार्ड.
 • पत्त्याचा पुरावा.
 • शिधापत्रिका (राशन कार्ड).
 • विभागाने दिलेले ओळखपत्र.
 • उत्पन्नाचा दाखला.
 • शासकीय किंवा खाजगी डॉक्टर कडून रोग निदान प्रमाणपत्र.

योजनेअंतर्गत महत्त्वाच्या बाबी

 • या योजनेअंतर्गत शासकीय तथा खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या  एकुण 973 रुग्णालयांचा समावेश करण्यात आलेला आहे.
 • ही योजना पूर्णपणे रोकड विरहित ( Cashless ) आहे.
 • आरोग्यमित्र : योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या रूग्णालयात शासनातर्फे आरोग्य मित्राची नेमणूक करण्यात येईल. आरोग्य मित्र हे रुग्णांचे वेळोवेळी मार्गदर्शन करतील. रुग्णांकडे असलेल्या रेशन कार्डच्या मदतीने रुग्णांची नोंद करण्याची जबाबदारी आरोग्य मित्रावर असेल. रुग्णालयाला नियमितपणे भेट देणे आणि रुग्णाला योजनेचा सर्व लाभ मिळत असल्याचे सुनिश्चित करणे ही जबाबदारी आरोग्य मित्राची राहील. रूग्णालयात दाखला मिळाल्यापासून तर रुग्ण घरी जाईपर्यंत आरोग्यमित्र हे रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना संपूर्ण सहकार्य करतील.
 • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत 1100 पद्धतींचे रोग उपचार आणि शस्त्रक्रिया समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
 • या 1100 पद्धतीमधील 111 उपचार पद्धती / शस्त्रक्रिया पद्धती शासकीय रुग्णालय यांच्यासाठी राखीव असतील.
 • या 1100 रोग उपचार शस्त्रक्रिया पद्धतीमधील 127 पाठपुरावा सेवा देखील (सर्जिकल आणि मेडिकल) रुग्णालयात मार्फत देण्यात येतील.
 • योजनेत समाविष्ट रुग्णालयांनी उपचारास नकार दिला किंवा हलक्या दर्जाच्या सेवा पुरवल्या तर त्याबाबत शासनाकडून त्या रुग्णालयावर पॅकेज रकमेच्या पाचपट दंड आकारण्याची तरतूद शासनाने केलेली आहे.

योजनेअंतर्गत देण्यात येणारे उपचार

 • सर्वसाधारण शस्त्रक्रिया
 • हृदय शस्त्रक्रिया व उपचार
 • बालरोग शस्त्रक्रिया व उपचार
 • स्त्रीरोग शस्त्रक्रिया
 • नेत्र शस्त्रक्रिया
 • हाडांची शस्त्रक्रिया
 • मेंदू व मज्जासंस्था यांच्यावरील शस्त्रक्रिया व उपचार
 • प्लास्टिक सर्जरी
 • जळालेल्या रुग्णांवरील उपचार
 • जठर व आतडे यांच्या शस्त्रक्रिया व उपचार
 • कृत्रिम अवयव
 • त्वचेच्या, सांध्याच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील उपचार
 • एंडोक्राइन
 • लहान मुलांचे कर्करोग
 • मानसिक आजार इत्यादी

योजनेचा लाभ घेण्याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

या योजनेअंतर्गत रुग्णांची ऑनलाईन नोंदणीची जबाबदारी आरोग्य मित्रांची असेल. योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेल्या सर्व रूग्णालयात आरोग्यमित्र उपलब्ध असतील. रुग्णाच्या नोंदणी प्रसंगी रुग्णाला ओळखपत्र म्हणून खालील पैकी कुठलेही एक कागदपत्र द्यावे लागेल. तसेच रुग्णाकडे असलेली वैध शिधापत्रिका / राशन कार्ड सोबत द्यावी  लागेल.

 • पॅन कार्ड
 • आधार कार्ड
 • ड्रायव्हिंग लायसन्स  
 • मतदान कार्ड
 • नॅशनलाईज बँक पासबुक फोटोसह
 • अपंग असल्याचे प्रमाणपत्र
 •  शाळा / कॉलेज ओळखपत्र
 • वरिष्ठ नागरिक कार्ड
 • स्वतंत्र सेनानी ओळखपत्र
 • माजी सैनिक कार्ड
 • राजीव गांधी जन आरोग्य योजना कार्ड
 • वरीलपैकी कुठलेही ओळखपत्र नसल्यास तहसीलदार यांचे प्रमाणपत्र स्वीकृत करण्यात येईल

योजनेअंतर्गत उपचार पूर्व मान्यता मिळण्याची पद्धत

सर्वप्रथम आपण दिलेल्या कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी केली जाईल  पडताळणी यशस्वी झाल्यास उपचाराला मान्यता देण्यात येईल. मान्यता नाकारण्यात आलेले अर्ज हे तांत्रिक समितीकडे पाठविले जाईल. तांत्रिक समिती मध्ये विमा कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य वैद्यकीय सल्लागार निर्णय देतात. जर त्यांच्या निर्णयांमध्ये तफावत असेल असे अर्ज अंतिम मान्यतेसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटी चे सहाय्यक संचालक यांच्याकडे पाठविण्यात येतात.

योजनेअंतर्गत रुग्णालयांची यादी शोधण्याची पद्धत

सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकारीक संकेतस्थळावर (वेबसाईट वर) जावे लागेल.

वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे खालील  होम पेज / मुख्यपृष्ठ उघडेल.

 

या पेजवर वरील उजव्या बाजूला मराठी / English भाषेची निवड तुम्हाला करता येईल . मराठी भाषेची निवड केल्यानंतर तुमच्या पुढे खालील पेज उघडेल

या पेज वर तुम्हाला “अंगीकृत रुग्णालये” वर क्लिक करून तुमच्या उपचारा संबंधित, आजार संबंधित किंवा तुमच्या जिल्हयात उपलब्ध रुग्णालयांची यादी बघता येईल.

एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत पॅकेज आधारित आजार आणि त्याला लागणाऱ्या खर्चाचे PDF डाउनलोड करण्याची पद्धत 

सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकारीक संकेतस्थळावर (वेबसाईट वर) जावे लागेल.

मराठी भाषेची निवड केल्यानंतर तुम्हाला “Operational Guidelines” वर जाऊन खाली आलेल्या “Package Costs” वर क्लिक करून फाईल डाउनलोड करता येईल किंवा खाली तीच फाईल आम्ही तुम्हाला PDF च्या रूपात देत आहोत तिथे ही तुम्ही बघू अथवा डाउनलोड करू शकता.

 

FAQ Section

एकत्रित ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रुपये 150000/- (दीड लाख) पर्यंत मेडिकल व सर्जिकल उपचार तसेच किडनी प्रत्यारोपणासाठी रुपये 250000/- (अडीच लाख) पर्यंत आरोग्य विम्याचा लाभ देण्यात येतो.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एकूण 1100 पद्धतींच्या आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया समाविष्ट केलेले आहेत.

नाही. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही पूर्णपणे रोकड विरहित म्हणजेच कॅशलेस आहे. रुग्णांना रुग्णालयात पैसे भरण्याची गरज नाही.

इतर महत्वाच्या योजना देखील बघा :

माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023

Share On:

Leave a Comment