माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना 2023 | MAJHI KANYA BHAGYASHREE YOJANA (MKBY) UPDATED 2023

माझी कन्या भाग्यश्री योजना माहिती 2023 | MAJHI KANYA BHAGYASHREE YOJANA APPLICATION FORM PDF | MAHARASHTRA MKBY SCHEME FOR GIRL CHILD | माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज प्रक्रिया 

महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील मुलींचे शिक्षण , आरोग्य यामध्ये सुधारणा करणे , त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे , बालिका भ्रुणहत्येस आळा घालणे , बालविवाह रोखणे , मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने सुकन्या योजना 2014 पासून दारिद्र्य रेषेखालील जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलींसाठी कुटुंबातील दोन अपत्यांपर्यंत लागू केलेली होती. या योजनेमध्ये काही बदल करत महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री हि योजना लागू केली. हि योजना  दारिद्र्य रेषेखालील(BPL) कुटुंबात जन्माला येणाऱ्या दोन मुलींसाठी लागू असून दारिद्र्य रेषेवरील(APL) कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठीही या योजनेत काही लाभ समाविष्ट करण्यात आले. परत शासनाद्वारे माझी कन्या भाग्यश्री या योजनेत बदल करून “ माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना” दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 7.50 लाख ( सात लाख पन्नास हजार ) पर्यंत आहे अशा सर्व समाजातील कुटुंबासाठी लागू करण्यात आली. माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेसाठी महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

योजनेचे उद्देश्य

 • महाराष्ट्र राज्यातील मुलींचे शिक्षण व आरोग्य यांचा दर्जा वाढवणे.
 • मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे.
 • बालिका भ्रृणहत्या रोखणे.
 • मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे.
 • बालविवाहास आळा घालणे आणि मुला इतकाच मुलींचा जन्मदर वाढवणे.
 • लिंग निवडीस प्रतिबंध घालणे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता 

 1. एका मुलीनंतर मातेने अथवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलीच्या नावे 50000/- रुपये ( पन्नास हजार रुपये )बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येईल. रुपये 50000/- इतक्या रकमेवर सहा वर्षानंतर जेवढे व्याज जमा होईल ते फक्त व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल. परत मुद्दल रुपये 50000/- गुंतवणूक करून सहा वर्षानंतर जेवढे व्याज जमा होईल हे व्याज मुलीला वयाच्या बाराव्या वर्षी काढता येईल. परत मुद्दल रुपये 50000/- गुंतवणूक करून सहा वर्षानंतर जमा झालेले व्याज तसेच मुद्दल या दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी काढता येईल. माता-पिता यांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच रुपये 50000/- इतकी रक्कम मुलीच्या नावावर जमा करण्यात येईल.
 2. दोन मुली नंतर मातेने अफवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या मुलीचे नावे प्रत्येकी रुपये 25000/- (पंचवीस हजार रुपये) या प्रमाणे रुपये 50000/- इतकी रक्कम दोन्ही मुलींच्या नावे बॅंकेत मुदत ठेव म्हणून  गुंतवण्यात येईल. रुपये 25000/- इतक्या रकमेवर सहा वर्षानंतर जेवढे व्याज जमा होईल ते फक्त व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल. परत मुद्दल रुपये 25000/- गुंतवणूक करून सहा वर्षानंतर जेवढे व्याज जमा होईल हे व्याज मुलीला वयाच्या बाराव्या वर्षी काढता येईल. परत मुद्दल रुपये 25000/- गुंतवणूक करून सहा वर्षानंतर जमा झालेले व्याज तसेच मुद्दल या दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी काढता येईल. माता-पिता यांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच रुपये 25000/- इतकी रक्कम प्रत्येक मुलीच्या नावावर जमा करण्यात येईल.

योजनेचा लाभ घेण्याकरिता अटी

 • लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • अर्ज करतांना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
 • मातेने अथवा पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
 • वार्षिक उत्पन्न रुपये साडेसात लाख पर्यंत असल्याचे तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागेल.
 • माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना चा लाभ 1 ऑगस्ट 2017 रोजी जन्मलेल्या व त्यानंतर च्या मुलींना लागू राहील.
 • ज्या कुटुंबांना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पूर्वी एक मुलगी आहे व दिनांक 1 ऑगस्ट 2017 नंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास व माता अथवा पित्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर फक्त दुसर्‍या मुलीला रुपये 25 हजार इतका या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
 • पहिले अपत्य मुलगा असल्यास व दुसरे अपत्य मुलगी असल्यास किंवा पहिले अपत्य मुलगी असल्यास व दुसरे अपत्य मुलगा झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
 • पहिले अपत्य मुलगी आहे व दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास तिला हा लाभ देय असेल मात्र तिसरे अपत्य जन्माला आल्यास त्यास हा लाभ देय नसेल. तिसरे अपत्य झाल्यास पहिल्या एक /दोन अपत्यांचे लाभही बंद होतील. तसेच प्रदान करण्यात आलेली रक्कम वसूल करण्यात येईल.
 • मुदत ठेवीत गुंतवण्यात आलेली मूळ रक्कम व त्यावरील अठराव्या वर्षी देय असणारे व्याज लागू होण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असते व इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे तसेच मुलगी अविवाहित असणे आवश्यक राहील.
 • दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या तर त्या मुली योजनेस पात्र असतील.
 • बालगृहात राहणाऱ्या अनाथ मुलींसाठीही ही योजना लागू राहील.
 • वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मुलीचा विवाह झाल्यास किंवा दहावी पूर्वी शाळा सोडल्यास किंवा दहावी नापास झाल्यास या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नाही तसेच मुलीचे नावे बँक खात्यात जमा असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाच्या नावे असणाऱ्या खात्यात जमा करण्यात येईल. परंतु नैसर्गिक कारणाने मुलीचा जर मृत्यू झाला तर मुलीच्या नावे गुंतवण्यात आलेली रक्कम मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर पूर्ण रक्कम मुलीच्या पालकांना देण्यात येईल.
 • एका मुलीच्या जन्मानंतर माता अथवा पित्याने एक वर्षाच्या आत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर करणे आवश्यक राहील. तसेच दोन मुलींनंतर सहा महिन्याच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावे लागेल.
 • ही योजना बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत राबविण्यात येईल. प्रत्येक मुलींसाठी स्वतंत्र खाते बँकेत उघडण्यात येईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया

 • अर्ज मिळण्याचे ठिकाण : ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, विभागीय उपायुक्त यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध राहतील.
 • मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र- अ किंवा प्रपत्र- ब पैकी जे लागू असेल मध्ये अर्ज सादर करावा.
 • अर्जासोबत उपरोक्त अटीनुसार नमूद दस्तऐवज सादर करण्यात यावेत.
 • अर्जदारांनी संपूर्ण तपशील भरणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेल्या अर्ज किंवा आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली नसल्यास अर्जदारांना एक महिन्याची वाढीव मुदत देण्यात येईल
 • अर्जाचा नमुना (Application Form PDF)

FAQ Section

माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असलेल्या आणि दिनांक एक ऑगस्ट 2017 रोजी जन्मलेल्या व त्यानंतर जन्मलेल्या मुलींना लागू राहील.

पहिले अपत्य मुलगी असल्यास व दुसरे अपत्य मुलगा झाल्यास किंवा पहिले अपत्य मुलगा असल्यास व दुसरे अपत्य मुलगी झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.

मुदत ठेवीत गुंतविण्यात आलेली रक्कम व त्यावरील व्याज लागू होण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे तसेच मुलीने इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आणि मुलगी अविवाहित असणे आवश्यक राहील.

इतर महत्वाच्या योजना बघा :

महाराष्ट्र मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम 2023

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र (MJPJAY) 2023

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) 2023

Share On:

Leave a Comment