महाराष्ट्र अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलामुलींना विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती सुधारित योजना 2023 | Updated Rajarshi Shahu Maharaj Foreign Scholarship Scheme Maharashtra (SC/Neo-Buddhist Students) 2023

SC विद्यार्थ्यांकरिता परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना माहिती । Foreign Education Scholarship For SC Students Maharashtra | परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना अभ्यासक्रम यादी महाराष्ट्र । Courses List Under Foreign Education Scholarship Maharashtra

महाराष्ट्र शासनातर्फे होतकरू आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्तीच्या अनेक योजना राबविल्या जातात. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी “राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती” ही योजना राबविण्यात येत आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेचे उद्देश

अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा असून देखील आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते. म्हणून शासनातर्फे अनुसूचित जातीच्या मुलांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा याकरिता महाराष्ट्र राज्यात राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना 2003 पासून लागू करण्यात आली.

योजनेंतर्गत परदेशातील शिक्षण संस्था आणि एकूण विद्यार्थी संख्या

 • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी ( Master’s Degree and PHD) अभ्यासक्रमाकरिता शिष्यवृत्ती लागू राहील.
 • वरील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना क्यूएस वर्ल्ड रँकिंग मध्ये 300 गुणांच्या (QS World University Rankings) आतील परदेशातील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेता येईल.
 • एकूण 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती मंजूर होईल.

योजनेंतर्गत अटी व शर्ती

 • विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • विद्यार्थी अनुसूचित जाती / नवबौद्ध समाजातील असावा.
 • विद्यार्थ्यांना क्यू एस वर्ल्ड रँकिंग मध्ये 300 गुणांच्या च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्था अथवा विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेला असावा.
 • विद्यार्थ्यांनी अर्ज करताना यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची परदेश शिष्यवृत्ती घेतलेली नसावी.
 • ज्या अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेला आहे तो अभ्यासक्रम नमूद केलेल्या विहित कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक असेल. अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही.
 • एक्झिक्युटिव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झिक्युटिव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवट अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. ( Students enrolled in Executive Master’s degree or Executive Master’s degree and part-time course will not be eligible for this scheme.)

योजनेंतर्गत वय मर्यादा

 • पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी – कमाल 35 वर्षे
 • पीएचडी अभ्यासक्रमांसाठी – कमाल 40 वर्षे

योजनेंतर्गत उत्पन्न मर्यादा

 • विद्यार्थ्यांच्या पालकांचे/कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 600000/- ( सहा लाख ) पेक्षा जास्त नसावे.
 • क्यूएस वर्ल्ड रँकिंग मधील पहिल्या 100 मध्ये समाविष्ट असलेल्या परदेशी शिक्षण संस्थांमध्ये / विद्यापीठांमध्ये तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची मर्यादा लागू असणार नाही.
 • विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरी करत असतील तर त्यांचे आयकर विवरण पत्र, फॉर्म नंबर 16 व सक्षम प्राधिकारी (तहसीलदार किंवा नायब तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
 • इतर विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकारी ( तहसीलदार किंवा नायब तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

योजनेंतर्गत शैक्षणिक पात्रता

पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक आहे.

पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक आहे.

योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील कमाल पात्रता धारक विद्यार्थी

 • योजनेचा लाभ एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येईल.
 • एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • ही शिष्यवृत्ती एकच वेळेस मान्य करण्यात येईल. एकापेक्षा जास्त वेळेस विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही.

योजनेंतर्गत अभ्यासक्रमांचा कालावधी

 • पदव्युत्तर पदवी 3 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो कालावधी.
 • पदव्युत्तर पदविका 2 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो कालावधी.
 • पीएचडी साठी 4 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो कालावधी.

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अभ्यासक्रमानुसार विद्यार्थी संख्या तक्ता

अनु. क्र. शाखा/अभ्यासक्रम पदव्युत्तर पदवी व
पदव्युत्तर पदविका
(PG)
डॉक्टरेट
(PHD)
एकूण
विद्यार्थी
संख्या
कला
वाणिज्य
विज्ञान
अभियांत्रिकी२५३१
व्यवस्थापन १२
वैद्यकीय
विधी
एकूण ४७२८७५

पदव्युत्तर पदवी / डॉक्टरेट (PHD) अभ्यासक्रमांसाठी जर एखाद्या वर्षी एखाद्या शाखेमध्ये उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर दुसऱ्या शाखेतील पदव्युत्तर पदवी / डॉक्टरेट (PHD) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये आंतर परिवर्तन करण्याचे अधिकार शासनास असतील हे आंतर परिवर्तन उभे अथवा आडवे असे कोणतेही प्रकारे असू शकेल.

वर नमूद वाणिज्य अभ्यासक्रमाच्या जागांपैकी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (UK) या विद्यापीठामध्ये / शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता अर्थशास्त्रातील PG व PHD अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी एक अशा एकूण दोन जागा राखीव ठेवण्यात येतील. या ठिकाणी उमेदवार उपलब्ध न झाल्यास कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्र किंवा इतर विषयात एक पदव्युत्तर व एक पीएचडी साठी निवड करण्यात येईल. या विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडीसाठी प्राधान्य देण्यात येईल.

परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरविण्यात येईल.

शिष्यवृत्ती करीत मंजूर केलेले अभ्यासक्रम

foreign scholarship courses
सौजन्य : https://www.maharashtra.gov.in/

PHD अभ्यासक्रमांच्या पात्रतेसाठी “Graduation/Post Graduation in concerned subject” ऐवजी “Graduation/Post Graduation in any subject” असा बदल करण्यात आलेला आहे.

योजनेंतर्गत अनिवार्य अटी

 • नोकरी करीत असलेल्या विद्यार्थ्याने नोकरी करीत असलेल्या संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.
 • पात्र विद्यार्थ्याने विहित नमुन्यात स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून नोटरी करून देणे गरजेचे आहे.
 • पात्र विद्यार्थ्याला दोन जामीनदार देणे बंधनकारक राहील.
 • प्रत्येक जामीनदारांकडून स्वतंत्र जामीन बंध (surety bond) करून देणे आवश्यक आहे.
 • शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या कालावधी पेक्षा जास्त कालावधी करिता परदेशात राहण्यास विद्यार्थ्यास परवानगी मिळणार नाही.
 • शिक्षणासाठी लागणाऱ्या कालावधीमध्ये किंवा त्यापूर्वी शिक्षण पूर्ण झाल्यास या दोघांपैकी जो कमी आहे त्या कालावधी पुरतेच परदेशात राहण्याचे बंधपत्र( Bond) राज्य शासनास तसेच परदेशातील भारतीय दूतावासास लिहून द्यावे लागेल.
 • विद्यार्थ्याला शासनाने विहित करून दिलेल्या नमुन्यात रेकॉर्ड रिलीज कन्सेंट फॉर्म ( record release consent form) हा बंधपत्राच्या स्वरूपात द्यावा लागेल.
 • विद्यार्थ्यास परदेशामध्ये प्रवेश मिळण्यासाठी क्यूएस वर्ल्ड रँकिंग मधील 300 च्या आतील क्रमवारीत असलेल्या विद्यापीठ/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी स्वतः प्रयत्न करावा लागेल आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व पात्रता परीक्षा देणे गरजेचे आहे.
 • ज्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण संस्थांकडून unconditional offer letter प्राप्त झाले असेल तेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. शिष्यवृत्तीसाठी conditional offer letter मान्य केले जाणार नाही.
 • विद्यार्थी विवाहित असल्यास त्याच्या पत्नी व मुले यांना परदेशामध्ये सोबत घेऊन जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सहाय्य दिले जाणार नाही. त्यांचे सर्व खर्च विद्यार्थ्यालाच करावे लागतील.
 • पासपोर्ट आणि व्हिसा (VISA) मिळविण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्याची असेल.
 • विद्यार्थ्यांना ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला आहे व शिष्यवृत्ती मिळाली आहे त्याच कारणासाठी विसा घेणे बंधनकारक असेल.
 • निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी मागणी केल्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल.
 • परदेशात शिक्षण घेत असताना अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जर विद्यार्थ्यांस भारतामध्ये यावयाचे असेल तर त्याने त्यासाठी संबंधित शैक्षणिक संस्था /विद्यापीठ आणि राज्य शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे आणि या बद्दलची माहिती संबंधित भारतीय दूतावासाला कळवणे गरजेचे आहे.
 • विद्यार्थी जेवढ्या कालावधीसाठी शैक्षणिक संस्थेमधून दूर राहील तेवढ्या कालावधीचा कोणताही खर्च त्यास लागू होणार नाही.
 • विद्यार्थ्याने परत त्याच परदेशी शिक्षण संस्थेमध्ये हजर न होता शिक्षण अर्धवट सोडल्यास त्याला देण्यात आलेले शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, इतर शुल्क व निर्वाह भत्ता याची व्याजासह वसुली करण्याबाबतचे लेखी हमीपत्र विद्यार्थ्यास द्यावे लागेल.

योजनेंतर्गत अर्ज करताना लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

 • शासनातर्फे ठरवून दिलेल्या विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज.
 • सक्षम प्राधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र.
 • पदवी / पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे पुरावे ( सनद/ मार्कलिस्ट)
 • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला
 • प्रदेशातील क्यू एस वर्ल्ड रँकिंग तीनशे पेक्षा कमी असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यापीठात प्रवेश मिळाला बाबतचे विना अट ऑफर लेटर (Unconditional Offer Letter)
 • ज्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला आहे त्याचे सविस्तर माहितीपत्रक (Prospectus)
 • दोन भारतीय नागरिकांचे जामीन पत्र
 • दोन राजपत्रित अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र
 • आवश्यक ते करारनामे व हमीपत्रे
 • संपूर्ण अभ्यासक्रमाकरिता वर्षाला लागणाऱ्या आवश्यक खर्चाचे अंदाजपत्रक. या आवश्यक खर्चामध्ये शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क , पाठ्यपुस्तके ,स्टेशनरी, भोजन व राहण्याचा खर्च ,येण्या जाण्याचा विमान प्रवास याचा समावेश असावा.
 • अद्ययावत क्यूएस वर्ल्ड रँकिंगची जागतिक क्रमवारी
 • वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी परदेशातील ज्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणार असेल त्या विद्यापीठास व अभ्यासक्रमास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची (MCI) मान्यता प्रमाणपत्र.

अर्ज करण्याची प्रक्रिया

 • प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यात महाराष्ट्र शासनातर्फे ह्या शिष्यवृत्ती योजनेसाठी वृत्तपत्रात तसेच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.
 • दरवर्षी 31 मे पर्यंत विद्यार्थ्यांना विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाइन अथवा ऑफलाइन सादर करावे लागतील.
 • निवड समितीने निश्चित केलेल्या पात्र विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी दिनांक 01 जुलै पूर्वी अथवा निवड समितीच्या निर्णयानंतर शासन जाहीर करेल.
 • शासनाने यादी जाहीर केल्यानंतर 15 जुलै पर्यंत संबंधित विद्यार्थ्यांना कळवून त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती / कागदपत्रे घेण्यात येतील तसेच या विद्यार्थ्यांची गृह चौकशी करण्यात येईल.
 • दिनांक 15 जुलै पर्यंत संबंधित शिक्षण संस्थेकडून विद्यापीठाकडून आवश्यक ती माहिती प्राप्त करून घेऊन पंधरा दिवसाच्या आत विद्यार्थ्यांना संबंधित परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये/विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आवश्यकतेनुसार अग्रीम रक्कम (ॲडव्हान्स राशी) मंजूर करण्यात येईल.
 • विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश घेतल्यानंतर आवश्यक ती माहिती व अग्रीम रकमेचे उपयोगिता प्रमाणपत्र, पोचपावती संबंधित परदेशी शैक्षणिक संस्थेकडून प्रमाणित होऊन प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्याला त्यावर्षीचे अग्रीम समायोजित करून पहिला अर्धवार्षिक हप्ता अदा करण्यात येईल.
 • विद्यार्थ्याला प्रत्येक सहा महिन्याला दिलेल्या शिष्यवृत्तीचे शिक्षण फी, परीक्षा फी, निर्वाह भत्ता इत्यादी चे उपयोगिता प्रमाणपत्र आणि प्रगती अहवाल आयुक्त समाज कल्याण पुणे यांना सादर केल्यानंतर पुढील सहा महिन्याची शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल

योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ

 • परदेशातील शैक्षणिक संस्थेने/विद्यापीठाने ऑफर लेटर मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण फी ही थेट संबंधित शैक्षणिक संस्था/विद्यापीठात अदा करण्यात येईल.
 • शासनातर्फे ठरविण्यात आलेल्या निकषाप्रमाणे निर्वाह भत्ता हा संबंधित विद्यार्थ्यांच्या परदेशातील त्याच्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
 • विद्यार्थ्यांना खालील बाबींसाठी होणाऱ्या खर्चा करिता दरवर्षी युएसए व इतर देशांसाठी 1500 युएस डॉलर आणि यु.के. साठी 1100 GBP इतका निर्वाह भत्ता, इतर खर्च, आकस्मिक खर्च म्हणून देण्यात येईल.

अभ्यासक्रमाला लागणारी आवश्यक पुस्तके वह्या व स्टेशनरी

 प्रबंध अहवाल तयार करणे

टायपिंग, बाइंडिंग

स्थानिक भेटी व इतर अभ्यास सहलींसाठी प्रवास खर्च

प्रबंधासाठी आवश्यक खर्च

इतर प्रसंगी खर्च

 • शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त खर्च होत असल्यास तो विद्यार्थ्यांना स्वतः करावा लागेल व त्याबाबतचे हमीपत्र विद्यार्थ्यांना व पालकांना अर्जासोबत जोडावे लागेल.
 • वरील शिष्यवृत्ती चा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यास परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे तसेच शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रा साठी किंवा दर सहा महिन्यांत सादर करावा लागेल.
 • प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक सहा महिन्याच्या खर्चाच्या पावत्या इत्यादी विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांकडून प्रमाणीत करून सादर करावे लागतील. त्याशिवाय पुढील हप्ता मंजूर होणार नाही.
 • परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणे आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर लगेच भारतात परत येण्यासाठी विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक क्लासचे विमान प्रवास भाडे देण्यात येईल. त्याकरता विद्यार्थ्याला विमान प्रवासाचे तिकीट, बोर्डिंग पास आणि अभ्यासक्रम विहित कालावधीत यशस्वीपणे पूर्ण केल्याचा पुरावा सादर करणे गरजेचे आहे.
 • एखाद्या प्रसंगी जर विद्यार्थ्याने किंवा पालकांनी परदेशी शिक्षण संस्थेत/विद्यापीठात शिक्षण फी, इतर अनुज्ञेय फी स्वतः भरलेली असेल तर आवश्यक त्या पावत्या आणि पुरावे सादर केल्यानंतर ती भरलेली रक्कम विद्यार्थ्यास देय होणाऱ्या शिष्यवृत्ती मधून विद्यार्थ्यांच्या परदेशातील खात्यावर जमा करण्यात येईल.
 • विद्यार्थ्याला भारतात राष्ट्रीयकृत बँकेत आणि परदेशात तिथल्या अधिकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य आहे.

नियम तसेच अटी व शर्तींचे पालन न केल्यास दंड /शिक्षा

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेताना नियमांचे तसेच अटी व शर्तींचे आणि बंधपत्रामध्ये लिहून दिलेल्या बाबींचे उल्लंघन केल्यास , परदेशी शैक्षणिक संस्थेने अभ्यासाविषयी अथवा वागणुकीविषयी अथवा गैरहजेरी विषयी प्रतिकूल अहवाल दिल्यास , विद्यार्थ्याने जिथे प्रवेश घेतला आहे तो देश सोडून निघून गेला असल्यास किंवा विद्यार्थ्यांने दुसरे विद्यापीठ/शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश विनापरवानगी घेतला असल्यास किंवा विद्यार्थ्यांची ज्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे तो अभ्यासक्रम त्याने विनापरवानगी बदलल्यास , विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्धवट सोडला असल्यास किंवा तो भारतात कोणताही प्रकारची परवानगी न घेता परत आल्यास अशा विद्यार्थ्यास डिफॉल्टर समजण्यात येईल आणि त्याला देण्यात आलेली शिष्यवृत्तीची रक्कम 12 % वार्षिक व्याजासह वसूल करण्यात येईल अशा प्रकारचे संयुक्त हमीपत्र विद्यार्थी व पालक यांनी सादर करणे आवश्यक राहील.

विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण न करणे , विहित प्रयोजनासाठी खर्च न करणे , नियमावलीतील तरतुदींचे उल्लंघन करणे , परदेशातील नियम/अटी तरतुदींचे उल्लंघन करणे , शैक्षणिक कालावधीत कोणत्याही प्रकारचे गैर कृत्य करणे आणि त्यासाठी दंड/शिक्षा होणे इत्यादी प्रकारामध्ये विद्यार्थ्यांना अपात्र ठरवून त्यांच्या परदेश शिक्षणासाठी शासनाने दिलेले सर्व लाभ व्याजासह वसूल करण्यात येईल

परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इतर महत्त्वाच्या अटी व शर्ती

 • पदव्युत्तर अभ्यासक्रम/ डॉक्टरेट (PHD) साठी जर एखाद्या शाखेमध्ये विद्यार्थी उपलब्ध झाला नाही तर त्या वर्षापुरते दुसऱ्या शाखेमधील विद्यार्थ्यांना QS वर्ल्ड रँकिंगच्या जेष्ठता क्रमानुसार शिष्यवृत्ती देण्यात येईल.
 • विद्यार्थ्यांची गुणवत्ता जर समसमान असेल त्यावेळी वयाने ज्येष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
 • अभ्यासक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्याने दोन महिन्याच्या आत आयुक्त समाज कल्याण पुणे यांना अंतिम परीक्षेचे मार्कलिस्ट, प्रमाणपत्र आणि प्रगती अहवाल व पदवीदान समारंभाचे छायाचित्रासह माहिती सादर करणे बंधनकारक राहील. त्याशिवाय विद्यार्थ्याला अंतिम विमान प्रवास व इतर लाभ दिले जाणार नाहीत.
 • अभ्यासक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्याला व्हिसा ची मुदत वाढवून देण्यात येणार नाही.
 • एकदा निवडण्यात आलेल्या विद्यापीठ/अभ्यासक्रम कुठल्याही परिस्थितीत बदलता येणार नाही.  मात्र सबळ कारण किंवा पुरावा सादर केल्यास अशा बदलास मान्यता देण्याचे अधिकार शासनाकडे राहतील.
 • परदेशी शिक्षणसंस्था/विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता GRE(GRADUATE RECORD EXAMINATION), TOEFL (TEST OF ENGLISH AS A FOREIGN LANGUAGE), IELTS (INTERNATIONAL ENGLISH LANGUAGE TESTING SYSTEM) इत्यादी परीक्षा जिथे अनिवार्य आहेत त्या उत्तीर्ण करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक राहील.
 • पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने ज्या विषयाची संशोधनासाठी निवड केली आहे त्या विषयाचा भारतामध्ये कोणत्याही विद्यापीठामध्ये अंतिम प्रबंध अहवाल (Thesis) सादर केला नसल्याचे घोषणापत्र (Declaration) सादर करणे आवश्यक आहे.
 • विद्यार्थ्याने खोटी माहिती किंवा कागदपत्रे सादर केल्याचे आढळल्यास त्यास पुढील शिक्षणासाठी रोख लावण्यात येईल आणि त्याच्याकडून झालेल्या खर्चाची 15% चक्रवाढ व्याजाने वसुली करण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांचा काळया यादीत (Black List) मध्ये समावेश केला जाईल.

नेहेमी विचारण्यात येणारे प्रश्न

इतर महत्वाच्या योजना बघा
Share On:

Leave a Comment